ETV Bharat / bharat

Deobandi Ulama : देवबंदी उलेमाची नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी

author img

By

Published : Jun 9, 2022, 10:25 PM IST

प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून देवबंदी उलेमाने (Deobandi Ulama) नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी (demanded the hanging of nupur sharma) केली आहे. देवबंदी उलेमा मौलाना कारी मुस्तफा देहलवी म्हणाले की, भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेला खोडसाळपणा खपवून घेतला जाणार नाही.

demanded the hanging of nupur sharma
नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी

सहारनपूर : प्रेषित मोहम्मद साहेबांवर भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप हायकमांडने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर देवबंदी उलेमांनी नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी केली आहे. इत्तेहाद उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देवबंदी उलेमा मौलाना कारी मुस्तफा देहलवी यांनी नुपूर शर्मा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की आपण सर्व काही सहन करू शकतो, परंतु अल्लाह वरील टीका कोणत्याही किंमतीत सहन करू शकत नाहीत.

ते म्हणाले की, नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ज्यांनी अल्लाह बाबत बोलताना गलिच्छपणा केला आहे. यासाठी आम्ही आमच्या 56 इंच छातीचे पंतप्रधान मोदी आणि भारत सरकार यांच्याकडे मागणी करतो की त्यांना त्वरित त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. कारण, संपूर्ण जगात भारत आणि इथे राहणारे लोक कलंकित झाले आहेत. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकतेच एका लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरां बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे इस्लामिक जगतात संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण इतके वाढले की भाजप हायकमांडला नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करावी लागली. असे असतानाही देवबंदी उलेमांची नाराजी कमी झाली नाही. यामुळे उलेमांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना फाशी देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Fir Against Bjp Suspended Leaders : नुपूर शर्मांसह अन्य काही जणांवर दिल्ली पोलिसांचे गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.