ETV Bharat / bharat

DCW Chief On Rape Victim : दिल्लीचे पोलीस आहेत की गुंडांचे सहकारी? स्वाती मालीवाल कडाडल्या, बलात्कार पीडितेला भेटण्यापासून रोखलं

author img

By

Published : Aug 22, 2023, 10:19 AM IST

Updated : Aug 22, 2023, 12:46 PM IST

दिल्लीतील महिला व बाल कल्याण विभागातील उपसंचालकानं अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करत तिचं लैंगिक शोषण केल्यानं खळबळ उडाली. याप्रकरणी पीडितेला भेटण्यास गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना रोखण्यात आलं. त्यामुळे स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे.

DCW Chief On Rape Victim
आंदोलनाला बसलेल्या स्वाती मालीवाल

नवी दिल्ली : वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं अत्याचार केल्यानं अत्याचार पीडिता गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत सोमवारी उघड झाला. याप्रकरणी अत्याचार पीडितेला भेटण्यास रुग्णालयात गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना पीडितेला भेटण्यापासून रोखण्यात आल्यानं मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या घटनेतील नराधम प्रेमोदय खाका हा दिल्ली महिला व बालविकास विभागात उपसंचालक आहे. दरम्यान स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस आहेत, की गुंड असा आरोपही स्वाती मालीवाल यांनी यावेळी केला आहे.

  • कल दोपहर 12 बजे से मैं पीड़िता बच्ची या उसके परिवार से मिलने के लिए अस्पताल के बाहर बैठी हूँ। रात को अस्पताल के बाहर ही सोई। NCPCR को लड़की की माँ से मिलवा सकते हैं तो मुझे क्यों रोकने के लिए बोला गया है ? क्या छुपाने की कोशिश है ? pic.twitter.com/9IC5LqCDCa

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वाती मालीवाल यांचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप : स्वाती मालीवाल यांनी दिल्ली अत्याचार प्रकरणातील पीडितेला भेटण्यासाठी रुग्णालयात धरण आंदोलन सुरु केलं होतं. दिल्ली पोलिसांनी स्वाली मालीवाल यांना रुग्णालयात पीडितेची भेट घेण्यास रोखल्यानं त्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अखेर दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांना पीडितेची भेट घेण्यास रुग्णालयात जाण्यास परवनगी दिली आहे.

  • मिलने नहीं आती तो बोलते मिलने नहीं आयी। मिलने आयी तो मिलने नहीं दे रहे और बोल रहे है ड्रामा कर रही है। किस हद्द तक राजनीति गिर चुकी है की नेताओं की सही को सही बोलने की क्षमता ही ख़त्म हो चुकी है। राजनीति करो, खूब करो पर बेटियों पे नहीं!

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे अत्याचार प्रकरण ? : दिल्लीतील महिला व बाल कल्याण विभागातील उपसंचालक असलेल्या प्रेमोदय खाका ( वय 51 ) यानं एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले होते. या अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानं ती गरोदर राहिली. या अत्याचारात नराधम प्रेमोदय याला त्याची पत्नी सीमा राणीनं मदत केली होती. दिल्लीतील महिला व बाल कल्याण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं अशाप्रकारचं अल्पवयीन तरुणीचं लैंगिक शोषण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • #WATCH | Delhi government official rape case | DCW chief Swati Maliwal continues to sit on 'dharna' at the hospital in Delhi where the minor girl has been admitted.

    She says, "Delhi Police is indulging in hooliganism. They are neither allowing me to meet the girl nor her mother.… pic.twitter.com/DNmeMT8rTv

    — ANI (@ANI) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वडिलाचं निधन झाल्यानं पीडिता राहत होती नराधमासोबत : या घटनेतील पीडितेचे वडील सरकारी सेवेमध्ये होते. त्यांचं निधन झाल्यानंतर पोरकी झालेल्या पीडितेला नराधम प्रेमोदय खाका यानं आपल्यासोबत ठेवलं होतं. ही पीडिता ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत बुरारी इथं आरोपी खाकासोबत राहत होती. पीडिता नराधम खाकासोबत राहत असल्यानं त्यानं पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गरोदर राहिली होती. या घटनेत नराधम प्रेमोदय खाकाच्या पत्नीनं त्याला साथ दिल्याचं पुढं आल्यानं पोलिसांनी सीमा राणीच्याही मुसक्याही आवळल्या आहेत.

  • #WATCH | Delhi government official rape case | Chairperson, Delhi Commission for Women Swati Maliwal leaves the hospital in Delhi where the minor girl has been admitted. pic.twitter.com/KWcMDKMLSs

    — ANI (@ANI) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वाती मालीवाल यांना भेटण्यास रोखलं : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयात धाव घेत यातील पीडितेला भेटण्यासाठी त्या रुग्णालयात गेल्या. मात्र स्वाती मालीवाल यांना पीडितेला भेटण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे स्वाती मालीवाल या प्रचंड संतापल्या. स्वाती मालीवाल यांनी पीडितेला भेटल्याशिवाय येथून हटणार नसल्याचा पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे. पीडितेला योग्य उपचार देण्यात येतात, की नाही, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचा दावा मालीवाल यांनी केला आहे.

  • #WATCH | Chairperson, Delhi Commission for Women Swati Maliwal says, "It's been more than 24 hours and they haven't let me meet the victim or her mother. Delhi police are the police of goons. They are not able to arrest the rapists. I wanted to meet the girl to understand that… pic.twitter.com/ZrPdYUDSmL

    — ANI (@ANI) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नराधम खाका निलंबित : पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम प्रेमोदय खाका याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचार प्रकरणी प्रेमोदय खाका याला अटक केल्याची माहिती दिल्ली उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली सरकारनंही प्रेमोदय खाका याचं निलंबन केलं आहे. याबाबत दिल्ली सरकारनं एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे.

Last Updated : Aug 22, 2023, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.