ETV Bharat / bharat

Delhi Ncr Pollution : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली एनसीआरचे प्रदूषण रेड झोनमध्ये

author img

By

Published : Oct 25, 2022, 5:47 PM IST

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिल्ली एनसीआरच्या प्रदूषणाच्या पातळीत मोठी ( Delhi Ncr Pollution ) वाढ झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीचा AQI 326 आहे. जो कमी श्रेणीत आहे.

Delhi Ncr Pollution
दिल्ली एनसीआरच्या प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ

नवी दिल्ली : दिवाळीच्या दिवशी दिल्ली जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. फटाक्यांमुळे दिल्लीची हवा विषारी झाली आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली दिवाळीच्या दिवशी जगातल्या प्रदूषणाची राजधानी ठरली आहे. दिल्लीतील प्रदुषणाची पातळीआधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले.

Pollution increasing in the air of Delhi NCR
दिल्ली एनसीआरच्या हवेत प्रदूषण वाढत आहे

हिवाळा सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावू लागते. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसला आहे. विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण झपाट्याने वाढत आहे.


दिल्ली-एनसीआरच्या प्रमुख भागांची प्रदूषण पातळी

दिल्ली-एनसीआर भागातप्रदूषण स्तर
आरके पुरम360
सिरी फोर्ट335
आईटीओ, दिल्ली331
अलीपुर, दिल्ली308
पंजाबी बाग, दिल्ली 336
आया नगर, दिल्ली 317
लोधी रोड, दिल्ली 317
CRRI मधुरा रोड, दिल्ली 347
पूसा, दिल्ली 322
जेएलएन स्टेडियम, दिल्ली 347
नेहरू नगर, दिल्ली 371
अशोक विहार, दिल्ली 330
सोनिया विहार, दिल्ली 304
विवेक विहार, दिल्ली 324
ओखला फेस टू, दिल्ली 345
शादीपुर, दिल्ली298
वजीरपुर, दिल्ली304
बवाना, दिल्ली311
श्री औरोबिंदो मार्ग347
लोनी, गाज़ियाबाद369
इंदिरापुरम, गाज़ियाबाद312
सेक्टर 62, नोएडा334
सेक्टर 1, नोएडा317
सेक्टर 116, नोएडा349
सेक्टर 125, नोएडा278

तज्ज्ञांच्या मते : जेव्हा हवेचा दर्जा निर्देशांक शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’ मानला जातो. तर 51 ते 100 ‘समाधानकारक’ मानले जातात. तर 101 ते 200 ची’मध्यम आणि 201 ते 300 घातक श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या शहराचा AQI 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर तेथील हवा विषारी असते. आणि 401 ते 500 अति गंभीर मानले जातात. तर तज्ज्ञांच्या मते, हवेतील सूक्ष्म कण ओझोन, सल्फर डायऑक्साइड, नायट्रिक डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि डायऑक्साइड या सर्वांमुळे श्वसनमार्गात जळजळ, अॅलर्जी आणि फुफ्फुसांचे नुकसान होते.

प्रदूषण वाढल्यावर घ्या ही खबरदारी

  • लहान मुले, वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांनी सकाळ-संध्याकाळ फिरू नये.
  • मास्क लावूनच घराबाहेर पडा.
  • अस्थमाच्या रुग्णांनी इनहेलरचा नियमित वापर करावा.
  • दम्याच्या रुग्णांनी औषध नियमित घ्यावे.
  • संध्याकाळी गरम पाण्याची वाफ घ्या.
  • घसा खवखवल्यास कोमट पाण्याने पिणे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.