ETV Bharat / bharat

Bitcoin Price Today : बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका.. किंमत आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर

author img

By

Published : Jun 30, 2022, 7:42 AM IST

Bitcoin Price Today
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये सोळा हजार रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ७७ हजार १३३ रुपये इतकी आहे.

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ७७ हजार १३३ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १९ हजार ९९३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ७७ हजार १३३ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०८५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८५ हजार ६५८ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.३७ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Todays Petrol Rates : 'या' जिल्ह्यात पेट्रोल- डिझेलचे दर भडकडले.. तर 'या' जिल्ह्यात झाले स्वस्त.. पहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.