ETV Bharat / bharat

Himachal Election 2022 : अबब! हिमाचलमधील 68 पैकी चक्क 65 आमदार आहेत करोडपती!

author img

By

Published : Dec 9, 2022, 5:54 PM IST

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा सत्ताबदल झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे हिमाचलमधील 68 विजयी उमेदवारांपैकी 65 उमेदवार कोट्यधीश आहेत. विजयी करोडपती उमेदवार कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा. (Winning Candidates Properties in Himachal) (HP Election Winning Candidates)

Etv Bharat
Etv Bharat

शिमला : हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यंदाही येथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसला 68 पैकी 40 जागांवर विजय मिळाला असून भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या आहेत. या निकालाची लक्षणीय बाब म्हणजे काँग्रेसचे सर्व 40 विजयी उमेदवार करोडपती आहेत! त्याचबरोबर भाजपचे 25 पैकी 22 विजयी उमेदवार करोडपती आहेत! याशिवाय हिमाचलमध्ये अपक्ष उमेदवारांनीही तीन जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवारही कोट्यधीश आहेत! (Winning Candidates Properties in Himachal) (MLA Properties in Himachal Pradesh).

काँग्रेसचे सर्व 40 विजयी उमेदवार कोट्यधीश : राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. हिमाचलच्या लोकांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम चालू ठेवली. राज्यातील विधानसभेच्या 68 पैकी 40 जागा काँग्रेसने काबीज केल्या. सर्व 40 विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत. प्रत्येकाकडे करोडोंची मालमत्ता आहे. शिमला ग्रामीण येथील विक्रमादित्य सिंग, नागरोटा येथील आरएस बाली आणि दून येथील राम कुमार पहिल्या तीनमध्ये आहेत. (Congress Winning Candidates Properties in Himachal)

कांग्रेसचे करोडपती आमदार विधानसभा सीट कांग्रेसचे करोडपती आमदार विधानसभा सीट कांग्रेसचे करोडपती आमदार विधानसभा सीट
1विक्रमादित्य सिंहशिमला ग्रामीण15विनय कुमारश्री रेणुका जी29जगत सिंह नेगीकिन्नौर
2आरएस बाली नगरोटा16नीरज नैय्यरचंबा30केवल सिंह पठानियाशाहपूर
3 राम कुमार दून17चैतन्य शर्मा गगरेट31 संजय अवस्थीअर्की
4राजेंद्र सिंह राणासुजानपूर18सुखविंदर सिंह सुक्खूनादौन32 नंदलाल रामपुर
5आशीष बुटेलपालमपूर19इंद्र दत्त लखनपाल बडसर33सुदर्शन सिंह चिंतपूर्णी
6भुवनेश्वर गौड़ मनाली20धविंद्र कुमार कुटलैहड34 यादविंदर गोमाजयसिंहपूर
7 सुंदर सिंह ठाकुर कुल्लू21विनोद सुल्लतानपुरी कसौली35मोहन लाल ब्राक्टारोहडू
8भवानी सिंह पठानियाफतेहपूर22मुकेश अग्निहोत्रीहरोली36राजेश धर्माणीघुमारवीं
9हर्षवर्धन चौहानशिलाई23किशोरी लालबैजनाथ37मलेंदर राजनइंदौरा
10रवि ठाकूर लाहौल स्पीति24हरीश जनारथाशिमला शहर38अजय सोलंकी नाहन
11रोहित ठाकूरजुब्बल कोटखाई25चंद्र कुमारज्वाली39सुरेश कुमारभोरंज
12अनिरुद्ध सिंहकसुम्पटी26कुलदीप सिंह राठौरठियोग40चंद्र शेखरधर्मपूर
13कुलदीप सिंह पठानियाभटियात27संजय रत्न ज्वालामुखी
14सुधीर शर्माधर्मशाळा28धनीराम शांडिलसोलन

भाजपचे 22 विजयी उमेदवार कोट्याधीश, 3 लक्षाधीश : हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी भाजपला केवळ 25 जागा जिंकता आल्या आहेत. त्या 25 पैकी 22 विजयी उमेदवार कोट्याधीश असून तीन उमेदवार लक्षाधीश आहेत. चौपालमधून विजयी झालेले बलवीर वर्मा हे सर्व 68 आमदारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहेत. याशिवाय, भाजपचे कोणते विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत आणि कोण लखपती आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील टेबल पहा. (BJP Winning Candidates Properties in Himachal)

भाजपचे करोडपती आमदार विधानसभा सीट भाजपचे करोडपती आमदारविधानसभा सीट भाजपचे करोडपती आमदारविधानसभा सीट
1बलवीर सिंह वर्माचौपाल12 इंद्र सिंहबल्ह 23 लोकेंद्र कुमार आनी
2अनिल शर्मामंडी13जीत राम कटवालझंडुता 24सुरेंद्र शौरी बंजार
3प्रकाश प्रेम कुमारजोगिंदर नगर14त्रिलोक जम्वालबिलासपूर 25दलीप ठाकूरसरकाघाट
4रणबीर सिंह निक्कानुरपूर15सत्तपाल सिंह सत्तीऊना
5धविंदर सिंह डलहौजी16 हंसराजचुराह
6पवन कुमार काजलकांगडा17सुखराम चौधरीपांवटा साहिब
7जयराम ठाकूरसराज18विनोद कुमारनाचन
8रणधीर शर्मा नैना देवी19दीप राज करसोग
9विपिन सिंह परमारसुलह20पूर्ण चंद द्रंग
10जनक राजभरमौर21 रीना कश्यप पच्छाद
11 राकेश कुमार सुंदरनगर22बिक्रम सिंह ठाकूरजसवां परागपूर

विजयी झालेले तीन अपक्षही करोडपती : हिमाचल प्रदेशात 3 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. केएल ठाकूर नालागड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर हमीरपूर मतदारसंघातून आशिष शर्मा आणि देहरा मतदारसंघातून होशियार सिंह यांनी विजय मिळवला आहे. हे तिन्ही उमेदवार करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.

2017 मध्ये इतके आमदार कोट्यधीश होते : ADR नुसार, 2017 मध्ये 68 पैकी 50 आमदार कोट्यधीश होते. 47 पैकी 29 भाजप आमदार आणि 20 काँग्रेस आमदार कोट्यधीश होते. तर एक करोडपती आमदार माकपचा होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.