ETV Bharat / bharat

controversy over loudspeakers: मशिदीवरील भोंग्याला विरोध केल्याने ग्रामस्थ संतप्त, भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

author img

By

Published : Apr 20, 2022, 3:56 PM IST

भाजप नेते ( BJP minority front Lukman ) लुकमान हे आज सकाळी नमाज अदा करून आपल्या भावासोबत घरी परतत होते. तेव्हा गावातील काही लोकांनी भाजपशी ( BJP leader beaten in Gonda ) संबंधित असल्याचा टोमणा मारला. त्यांना उद्देशून म्हटले की, जो पक्ष मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवित आहे, त्या पक्षाशी तुम्ही संबंधित आहात. अशा परिस्थितीत आता नमाज पठण करू नका. यावरून ग्रामस्थांची भाजप नेते लुकमान ( BJP leader Lukman video news ) यांच्याशी बाचाबाचीही झाली.

मशिदीवरील भोंग्याला विरोध केल्याने ग्रामस्थ संतप्त
मशिदीवरील भोंग्याला विरोध केल्याने ग्रामस्थ संतप्त

गोंडा - मशिदींवरील लाऊडस्पीकरचा वाद आता उत्तर प्रदेशातील गोंडा शहरातही पोहोचला आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस लुकमान ( BJP leader Lukman beaten ) यांना मारहाण करण्यात आली आहे.

भाजप नेते ( BJP minority front Lukman ) लुकमान हे आज सकाळी नमाज अदा करून आपल्या भावासोबत घरी परतत होते. तेव्हा गावातील काही लोकांनी भाजपशी ( BJP leader beaten in Gonda ) संबंधित असल्याचा टोमणा मारला. त्यांना उद्देशून म्हटले की, जो पक्ष मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवित आहे, त्या पक्षाशी तुम्ही संबंधित आहात. अशा परिस्थितीत आता नमाज पठण करू नका. यावरून ग्रामस्थांची भाजप नेते लुकमान ( BJP leader Lukman video news ) यांच्याशी बाचाबाचीही झाली. या वादात भाजप नेते लुकमान यांनी जीव वाचविण्याकरिता पळून केले.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

एसपी पोहोचले घटनास्थळी- घराच्या गेटवर काही लोक गेटवर उभे राहिले होते. त्यांना घाणेरडे शिवीगाळ करू लागले. गेटवर लाथा मारायला लागले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचवेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित भाजप नेता लुकमान यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ तसेच पीडित भाजप नेता आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

गावामध्ये पोलीस बंदोबस्त-एसपींनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच गावात सभा घेऊन एकोपा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही घटना कोतवाली परिसरातील बंकटवा गावातील आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गावात शांतता राखण्याचे आवाहन - पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, कोतवाली नगर अंतर्गत बंकटवा गावातील मशिदीमध्ये नमाज अदा करण्यावरून आपापसात काही वाद झाला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीडित भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच ग्रामस्थांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा-Jahangirpuri Violence : घरे उद्ध्वस्त करून भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले आहे -ओवेसी

हेही वाचा-माँ तुझे सलाम! आनंद महिंद्रांनी शेअर केला पक्ष्याचा व्हिडिओ

हेही वाचा-Dalits from a Bharatpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मारहाण; सहा गावांतील दलितांचे स्थलांतरण सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.