Pathaan Movie Controversy: पठाण चित्रपटाच्या निषेधादरम्यान बजरंग दलाची आक्षेपार्ह घोषणाबाजी ; कारवाई करण्याची मागणी

Pathaan Movie Controversy: पठाण चित्रपटाच्या निषेधादरम्यान बजरंग दलाची आक्षेपार्ह घोषणाबाजी ; कारवाई करण्याची मागणी
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इंदूरच्या विविध भागात पठाण चित्रपटाबाबत निदर्शने केली होती. त्यात धर्माविरोधी घोषणांचा प्रभाव देवासमध्येही दिसून आला. बजरंग दलाच्या आक्षेपार्ह घोषणांवर कारवाई करण्याची मागणी करत विशिष्ट धर्माच्या लोकांनी घोषणा दिल्या.
देवास : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पठाण चित्रपटाच्या निषेधादरम्यान कथित धर्माविरोधी घोषणांचा परिणाम देवासमध्ये दिसून आला. शेकडोच्या संख्येने जमून घोषणाबाजी आणि निदर्शने करताना विशेष समाजाचे लोक देवास एसपी शिवदयाल सिंह यांच्या कार्यालयासमोर रस्ता अडवून जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. या संपूर्ण निदर्शनादरम्यान 'सर तन से जुदा' अशी वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती.
समाजाकडून घोषणाबाजी विरोधात निवेदन : यावेळी धर्माविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर र्मविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कारवाईसाठी निवेदनही दिले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसपी कार्यालयासमोर जमा होण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यानंतर हे भयंकर निदर्शन सुरू झाले. जे सुमारे 1 तास सुरू होते. या संपूर्ण निदर्शनादरम्यान 'धड शरीरापासून वेगळे करा' अशा वादग्रस्त घोषणाही देण्यात आल्या. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी, एएसपी, सीएसपी, डीएसपी यांच्यासह शेकडो पोलीस दल उपस्थित होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमाजानंतर एसपी कार्यालयासमोर जमा होण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यानंतर हे जोरदार निदर्शने सुरू झाले होते. निदर्शन सुमारे 1 तास चालले होते.
इंदूरमध्येही आक्षेपार्ह घोषणाबाजी : आज इंदूरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. जिथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाबाबत निदर्शने केली होती. याच भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इंदूरमधील छत्रीपुरा पोलीस ठाण्यात पठाण चित्रपटाबाबत निदर्शनेही केली. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विशिष्ट धर्माच्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यातच शहराची शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी समाजाच्या नेत्यांनी मागणी केली. धर्माविरुद्ध कोणताही आक्षेपार्ह शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात खपवून घेतला जाणार नाही. 'सर तन से जुदा' अशा घोषणा जिल्ह्यात पहिल्यांदाच झाल्या नाहीत, याआधीही अनेकवेळा अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. ज्यांच्या विरोधात पोलीसांनी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी खांडव्यातील मिरवणुकीदरम्यान वादग्रस्त घोषणा दिल्याचे प्रकरण समोर आले होते. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे जमावातील काही तरुण शिरच्छेदाच्या घोषणा देत होते.
