Protesting Against Pathan film in Satara : साताऱ्यात हिंदू एकता संघटनेचा पठाण चित्रपटाला विरोध; चित्रपटाचा शो पोलीस बंदोबस्तात सुरू

Protesting Against Pathan film in Satara : साताऱ्यात हिंदू एकता संघटनेचा पठाण चित्रपटाला विरोध; चित्रपटाचा शो पोलीस बंदोबस्तात सुरू
शाहरूख खानचा पठाण हा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे कळताच हिंदू एकता आंदोलनाचे उंब्रज (ता. कराड) येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित करू नये, असे निवेदन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले. त्यामुळे पहिला शो थांबविण्यात आला. मात्र, दुपारी पोलीस बंदोबस्तात शो सुरू झाला.
सातारा : शाहरूख खानचा पठाण हा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे कळताच हिंदू एकता आंदोलनाचे उंब्रज (ता. कराड) येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित करू नये, असे निवेदन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले. त्यामुळे पहिला शो थांबविण्यात आला. मात्र, दुपारी पोलीस बंदोबस्तात शो सुरू झाला.
हिंदू एकता आंदोलनाचे कराड उत्तर तालुकाध्यक्षांचे निवेदन : उंब्रज येथील चित्रपटगृहात अभिनेता शाहरुख खानचा वादग्रस्त ठरलेला पठाण चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळताच. हिंदू एकता आंदोलनाचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेश जाथव यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन व्यवस्थापनाला देण्यात आले. त्यामुळे व्यवस्थापनाने दुपारी बाराचा शो थांबवला.
पोलीस संरक्षणात शो सुरू : शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा चित्रपट काही दिवसांपासून विरोधाचा सामना करत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात आघाडी उघडली आहे. उंब्रजमधील हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी केल्यामुळे व्यवस्थापनाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. पण पुन्हा तीनचा शो पोलिस संरक्षणात सुरू करण्यात आला.
'हिंदू एकता'चा विरोध : पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला 'हिंदू एकता' आंदोलनाचा विरोध पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात पठाण चित्रपटाला पहिला विरोध कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये झाला. हिंदू एकता आंदोलनाचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विक्रम माने, मिटू वाघमारे, राजेंद्र यादव, दीपक हजारे, संजय पाटील, शंकर मोरे, आप्पा सोनवणे, शुभम जाधव या कार्यकर्त्यानी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला निवेदन देऊन चित्रपटाचे प्रदर्शन रोखले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात शो सुरू करावा लागला.
