ETV Bharat / bharat

आसामचे मुख्यमंत्री फक्त नागपूर आणि दिल्लीचं ऐकतात - राहुल गांधी

author img

By

Published : Feb 14, 2021, 9:06 PM IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल यांनी आसाममधील एका प्रचार सभेत भाजपावर जोरदार टीका केली. राज्याला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे. जो लोकांचा आवाज ऐकल. केवळ नागपूर आणि दिल्लीचा नाही, अशी टीका राहुल यांनी केली.

राहुल गांधी
राहुल गांधी

शिवसागर (आसाम) - आसाममध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून प्रचार सभा आयोजीत करण्यात आला होती. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल यांनी प्रचार सभेत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि आरएसएस आसामचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राज्यात सत्तेत आल्यास काँग्रेस कधीच नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू करणार नाही, असे ते म्हणाले.

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आसाममधील आपल्या पहिल्या जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधींनी भाजपावर जोरदार टीका केली. राज्याला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे. जो लोकांचा आवाज ऐकल. केवळ नागपूर आणि दिल्लीचा नाही, अशी टीका राहुल यांनी केली. आसाममधील बेकायदेशीर वास्तव्याचा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात येईल, असे ते म्हणाले.

भाजपाकडून आसामचे विभाजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जर आसामचे विभाजन झाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांना काही त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र, आसाम आणि उर्वरित भारतातील लोकांवर त्याचा परिणाम होईल. काँग्रेस आसाममध्ये कोणत्याही परिस्थितीत सीएए कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असेही ते म्हणाले.

रिमोट कंट्रोल टीव्ही चालवू शकतो. मात्र, मुख्यमंत्री नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नागपूर व दिल्लीचे ऐकतात. आसामला असा मुख्यमंत्री हवा. जो आसामच्या जनतेचे ऐकेल आणि तरुणांना नोकरी देईल, असेही ते म्हणाले.

आसाम विधानसभा निवडणूक -

एप्रिल 2021 मध्ये आसामच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आसाम विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. गेल्या निवडणुकीमध्ये आसाम विधानसभेमधील सर्व 126 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील रालोआने 86 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व आसाममधील कॉंग्रेस पक्षाची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.