ETV Bharat / bharat

Rahul Gandhi : राहुल गांधींनी RSS आणि BJP नेत्यांना सुनावले, मायावतींवरही केले वक्तव्य

author img

By

Published : Dec 31, 2022, 2:29 PM IST

Updated : Dec 31, 2022, 3:39 PM IST

काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Congress Mp Rahul Gandhi ) यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद ( Rahul Gandhi press conference ) घेतली. यामध्ये त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ( Congress Mp Rahul Gandhi Targets Bjp )

Congress Mp Rahul Gandhi
राहुल गांधी वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ( Congress Mp Rahul Gandhi ) यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, ( Rahul Gandhi press conference ) मी विशेषत आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मानतो कारण ते जितके जास्त हल्ले करतात, तितकी आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. काँग्रेस पक्षाला त्यांची विचारधारा अधिक चांगल्या प्रकारे समजावी यासाठी त्यांनी ते अधिक जोरात करावे अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना माझा गुरू मानतो की ते मला काय करावे आणि काय करू नये याचे मार्ग दाखवत आहेत आणि चांगले प्रशिक्षण देत आहेत. ( Congress Mp Rahul Gandhi Targets Bjp )

भारत जोडो यात्रेची दारे सर्वांसाठी खुली : भारत जोडो यात्रेतील ( Bharat Jodo Yatra ) सर्व नेत्यांना निमंत्रण देताना ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेची दारे सर्वांसाठी खुली आहेत, आम्ही कुणालाही सहभागी होण्यापासून रोखणार नाही. अखिलेश जी, मायावती जी आणि सर्व विरोधी पक्षांना 'मोहब्बत का हिंदुस्तान' हवा आहे आणि आमच्यामध्ये विचारधारेची एकता आहे.

  • #WATCH | Why is there so much disturbance because of the T-shirt? I do not wear a sweater because I am not scared of winter. I am thinking to wear a sweater once I start feeling cold: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/Jky5DKPpKG

    — ANI (@ANI) December 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विजय मिळवणे कठीण : राहुल गांधी म्हणाले की, त्यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असून देशाला एक नवा दृष्टीकोन देणे हा त्यांचा उद्देश आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवणे खूप कठीण असेल आणि भाजपच्या विरोधात जमिनीवर मोठ्या प्रमाणावर 'सत्ताविरोधी वातावरण' असल्याचा दावाही राहुल यांनी केला.

सरकारचे परराष्ट्र धोरण भ्रामक : दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले की, मला जी माहिती मिळत आहे त्यावरून भाजपला पुढील निवडणूक जिंकणे कठीण होणार असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणावर सत्ताविरोधी वातावरण आहे. यात्रेच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांच्या (राहुलच्या) सुरक्षेशी संबंधित विषयावर भाजप नेते आणि सरकारचे वेगवेगळे निकष आहेत. राहुल म्हणाले, 'देशाला पर्यायी दृष्टिकोन देण्याचा माझा उद्देश आहे. नरेंद्र मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण भ्रामक असल्याचा आरोप त्यांनी केला.

Last Updated : Dec 31, 2022, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.