ETV Bharat / bharat

गरज पडल्यास काँग्रेस टीएमसीला पाठिंबा देईल? या प्रश्नावर अधीर रंजन चौधरी म्हणाले...

author img

By

Published : Apr 8, 2021, 6:00 PM IST

अधीर रंजन चौधरी
अधीर रंजन चौधरी

बंगाल काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गरज पडल्यास काँग्रेस पाठिंबा देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी अधिर रंजन यांनी काल्पनीक प्रश्नांची ही वेळ नाही. मात्र, राजकारणात काहीही शक्य आहे, असे उत्तर दिले.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस-डाव्याची युती सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. बंगाल काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गरज पडल्यास काँग्रेस पाठिंबा देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी अधिर रंजन यांनी काल्पनीक प्रश्नांची ही वेळ नाही. मात्र, राजकारणात काहीही शक्य आहे, असे उत्तर दिले.

अधीर रंजन चौधरी यांची पत्रकार परिषद

काल्पनिक प्रश्नांची ही वेळ नाही. कारण आम्ही सत्तेत येणार आहोत. ममता बॅनर्जी हरल्यास त्या कुणासोबत जातील हे माहित नाही. राजकारणात काहीही होऊ शकते, असे चौधरी म्हणाले.

चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. मात्र, केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले होते. निवडणुकांच्या वेळी प्रत्येक दुर्घटनेला केवळ केंद्रीय दलाचे सैनिक थांबवू शकत नाहीत. याची जबाबदारीही राज्य पोलिसांवर आहे, असेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये तीसऱ्या टप्प्यात सहा एप्रिलला मतदान पार पडले. यावेळी 31 विधानसभा जागांवर 84.61 टक्के मतदान झाले. तर राज्यात पहिल्या टप्प्यात 84.13 आणि दुसरे टप्प्यात 86.11 टक्के मतदान झाले होते. राज्यातील 294 मतदारसंघापैकी 91 जागांवरील मतदान पार पडले आहे. अद्याप निवडणुकीचे पाच टप्पे बाकी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.