ETV Bharat / bharat

Chhattisgarh Assembly Elections 2023 : छत्तीसगड विधानसभा मतदानाला सुरुवात; नक्षलवाद्यांचा निवडणुकीत धुमाकूळ, आयईडी स्फोटात एक जवान जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 8:04 AM IST

Updated : Nov 7, 2023, 1:25 PM IST

Chhattisgarh Assembly Elections 2023 : छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणूक 2023 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजतापासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 20 मतदार संघासाठी मतदान होत असून यातील 10 मतदार संघ हे नक्षल प्रभावित आहेत.

Chhattisgarh Assembly Elections 2023
संपादीत छायाचित्र

रायपूर Chhattisgarh Assembly Elections 2023 : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात 20 मतदार संघासाठी मतदान होत आहे. यातील 10 मतदार संघ नक्षल प्रभावित असल्यानं तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज सकाळी नक्षलवाद्यांनी बांदा मतदान केंद्रावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी 2 किमी अंतरावरुन निवडणुकीच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या डीआरजी जवानांवर गोळीबार केला. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे 10 मिनिटानंतर नक्षलवाद्यांचा गोळीबार थांबला. सुरक्षा दलाचे जवान सुरक्षित असून मतदान सुरळीत सुरू आहे. - सुकमा पोलीस

नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, सुकमा इथं आयईडी स्फोट : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. नक्षलवाद्यांनी सुकमा इथं आयईडी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक केंद्रीय राखिव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचा जवान जखमी झाला आहे. निवडणूक कर्तव्य बजावत असताना हा जवान जखमी झाल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली आहे.

  • Voting for the first phase of Chhattisgarh Assembly Elections 2023 begins.

    Twenty of the 90 assembly seats will be voting in the first phase of polls. Over 40 lakh electors will vote across 5,304 polling stations in the first phase. pic.twitter.com/HTHM9J39nj

    — ANI (@ANI) November 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मतदान केंद्राच्या दोन किमीवरुन हल्ला : सुकमा इथं मतदानादरम्यान मतदान केंद्राच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा हल्ला हाणून पाडला. त्यानंतर नक्षलवाद्यांना घटनास्थळावरुन पळ काढावा लागला. सुकमा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. परिसरात मतदान सुरू असून, सर्वजण कोणतीही भीती न बाळगता मतदान करत आहेत. सुकमामध्ये सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

पहिल्या टप्प्यात 20 मतदार संघात मतदान : छत्तीसगडमधील विधानसभा मतदार संघासाठी आजपासून मतदान सुरू झालं आहे. पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या या मतदानाला आज सकाळी सात वाजतापासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघातील 10 मतदार संघ नक्षल प्रभावित आहेत. त्यामुळे प्रशासनानं तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 मतदार संघात मतदान होत आहे.

10 मतदार संघ नक्षल प्रभावित : छत्तीसगड हे नक्षल प्रभावित राज्य आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा गड असल्याचं वेळोवेळी झालेल्या नक्षलवादी कारवायामधून स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही छत्तीगडमधून नक्षली कारवाया सुरु असतात. त्यामुळे प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज होणाऱ्या छत्तीसगडमधील विधानसभा मतदानातील 10 मतदार संघ नक्षल प्रभावित आहेत. त्यामुळे प्रशासनानं विशेष खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा :

  1. Telangana Assembly Election : YSRTP ची तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून माघार, कॉंग्रेसला पाठिंबा
  2. Naxalite Killed Villagers : मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी केली तीन गावकऱ्यांची हत्या
Last Updated : Nov 7, 2023, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.