ETV Bharat / bharat

Cheetah Died : कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एक चित्याचा मृत्यू, 'हे' कारण आले समोर

author img

By

Published : May 9, 2023, 9:34 AM IST

Cheetah Died
संग्रहित छायाचित्र

कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण ऑफ्रिकेतून आणण्यात आलेल्या उदय या चित्याचा मृत्यू झाला आहे. या चित्याला किडनीचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

भोपाळ : कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण ऑफ्रिकेतून चिते आणण्यात आले आहेत. मात्र या चित्यांमधील एक चिता मृत झाला आहे. उदय असे मृत झालेल्या चित्याचे नाव असून त्याला किडनीचा संसर्ग झाला आहे. त्याच्या व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्याच्या प्राथमिक अहवालातून चिता उदयला विषाणू आणि जीवाणूंचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 23 एप्रिल रोजी चिता उदयचा मृत्यू झाला आहे.

Cheetah Died
संग्रहित छायाचित्र

चिता उदयची किडनी निकामी झाल्याने मृत्यू : कुनो नॅशनल पार्कमधील चिता उदयचा मृत्यू 23 एप्रिलला झाला होता. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. चीता उदयच्या मृत्यूनंतर घेतलेल्या व्हिसेरा आणि रक्ताच्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात विषाणू आणि जीवाणूंचा संमिश्र संसर्ग आढळून आला आहे. त्याच्या सविस्तर अहवालासाठी आता या नमुन्यांचे मेटा जीनोमिक अनुक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी देखील केली जात आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू संसर्गामुळे झाला नाही की नाही हे कळू शकणार आहे. याबाबतचा अहवाल दोन आठवड्यांनी येणार आहे.

पहिल्या चित्याचाही किडनीच्या संसर्गामुळे मृत्यू : दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12 चित्ता आणण्यात आले आहेत. त्यापैकी चिता उदय हा एक होता. उदय हा 65 वर्षाचा असल्याचे सांगितले जाते. उदयला भारतात आणण्यापूर्वी केलेल्या रक्त तपासणीमध्ये कोणताही संसर्ग आढळला नसल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक जे एस चौहान यांनी दिली. मात्र, याआधीही 27 मार्च रोजी नामिबियाहून श्योपूर येथील कुनो येथे आणलेल्या चित्याचा किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला होता.

किडनी संसर्गाने मृत्यू : गेल्या काही दिवसांपासून मादी चित्याची तब्येत खराब असल्याचे सांगण्यात आले. मॉनिटरिंगमध्ये सुस्ती दाखवल्यानंतर त्याला क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर रक्त तपासणी करण्यात आली. यात त्याच्या किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले. पुढे त्याचा मृत्यू झाला होता. भारतात आणण्यापूर्वीच केलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या अहवालात संसर्ग आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेतून आणले चित्ते : देशात चित्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने हे चित्ते आफ्रिकेतून आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले आहेत. या चित्यांच्या दोन बॅच आतापर्यंत आल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 सप्टेंबरला नामिबियातून पहिले चिते आणले होते. त्यात 8 चिते होते, तर दुसऱ्यांदा फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले होते.

हेही वाचा -

Election Commission Notice To Sonia Gandhi : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना

Ancient Trading Market: 'या' ठिकाणी सापडली दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन व्यापारी बाजारपेठ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.