ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 : इस्रो प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या चांद्रयान 3 कधी लॉन्च होणार

author img

By

Published : May 29, 2023, 4:22 PM IST

इस्रो या वर्षी जुलैमध्ये चांद्रयान 3 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात नेव्हिगेशन उपग्रह NSV-01 चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर ते बोलत होते.

Chandrayaan 3
चांद्रयान 3

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले की, चांद्रयान - 3 यावर्षी जुलैमध्ये प्रक्षेपित होईल. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) येथून दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NSV-01 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर त्यांनी हे भाष्य केले.

2019 मध्ये चांद्रयान-2 झाले होते क्रॅश : आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. लँडरमध्ये चंद्राच्या नियुक्त केलेल्या जागेवर सॉफ्ट लॅंडींग करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल, जे त्याच्या गतिशीलतेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करेल. भारतीय चंद्र अन्वेषण कार्यक्रम ही इस्रोच्या बाह्य अवकाश मोहिमांची एक सतत चालू असलेली मालिका आहे. 2019 मध्ये चांद्रयान - 2 यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले होते आणि ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. परंतु त्याचे लँडर 6 सप्टेंबर 2019 रोजी एका सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करताना क्रॅश झाले.

चांद्रयान 3 बद्दल जाणून घ्या : चांद्रयान - 3 हे चांद्रयान - 2 चे फॉलो-अप मिशन आहे. याने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि रोमिंगमध्ये एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित केली आहे. यामध्ये लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. हे यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 द्वारे प्रक्षेपित केले जाईल. प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन चंद्राच्या 100 किमी कक्षेपर्यंत नेईल. विशेष म्हणजे, इस्रोने सोमवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) यशस्वीपणे प्रक्षेपित केले.

हे ही वाचा :

  1. ISRO launches NVS 01 : इस्त्रोने लाँच केले एनव्हीएस 01 अ‍ॅडव्हांस नेव्हिगेशन सॅटेलाईट
  2. Transponders For Fishermen : मच्छिमारांना मिळतील इस्रोने तयार केलेले ट्रान्सपॉन्डर मोफत, चक्रीवादळाचा इशारा मिळणार
  3. ISRO News : इस्रोने केले आरएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण, हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किमी उंचीवर उड्डाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.