ETV Bharat / bharat

Case Against Bageshwar Dham : देवाचा अवतार सांगून फसवणूक केल्याचा आरोप; बागेश्वर बाबाविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : May 1, 2023, 6:51 PM IST

Updated : May 1, 2023, 7:30 PM IST

बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूर सिव्हिल कोर्टात ज्येष्ठ वकील सूरज कुमार यांनी बागेश्वर बाबा यांच्या विरोधात स्वतःची तुलना देवाशी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Bageshwar Dham
बागेश्वर सरकार
बागेश्वर सरकारवर बिहारमध्ये गुन्हा दाखल

मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात वादग्रस्त बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात वकील सूरज कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, राजस्थानमधील एका धर्मसभेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी स्वतःला हनुमानाचा अवतार म्हटले होते. असे करून ते हिंदू धर्माच्या भावनांशी खेळत आहेत. आता त्यांच्यावर भादंवि कलम 295 ते 298 505 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर कोर्टात बागेश्वर बाबा विरुद्ध खटला : तक्रारदार वकील सूरज कुमार म्हणाले की, 'मी जिल्ह्यातील एसीजेएम सबजज वेस्टर्न यांच्या कोर्टात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात केस दाखल केली आली आहे. मी आरोप केला आहे की, धीरेंद्र शास्त्री हे स्वतःला देवाचा अवतार मानतात. ते चुकीच्या सनातनी पद्धतीने देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आमच्यासह कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी न्यायालयात आयपीसी 295, 298, 505 नुसार तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने माझी तक्रार स्वीकारली आहे आणि सुनावणीसाठी 10 मे ही तारीख निश्चित केली आहे'.

स्वत:ला देव म्हणवून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप : मुजफ्फरपूर वर्तणूक न्यायालयाचे वकील विनय कुमार यांनी सांगितले की, 'बिहारमधील मुझफ्फरपूर येथील ज्येष्ठ वकील सूरज कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बागेश्वर धाम असे आडनाव असलेले धीरेंद्र शास्त्री हे स्वत:ला देवाचे अवतार बजरंग बलीचे रूप असल्याचे सांगतात. यामुळे हिंदू समाज दुखावलेला आहे. या प्रकरणी मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीजेएम अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी प्रथम पश्चिम विकास कुमार मिश्रा यांच्या न्यायालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे. न्यायालयाने तक्रार मान्य करून 10 मे ही पुढील तारीख निश्चित केली आहे'.

बागेश्वर बाबांच्या पाटणा दौऱ्यावरून राजकारण : पाटणा येथे धीरेंद्र शास्त्री यांचा पाच दिवसांचा कार्यक्रम होणार आहे. 13 मे ते 17 मे पर्यंत बागेश्वर सरकार पाटणा येथील नौबतपूर येथे दरबार भरवून हनुमत कथा वाचणार आहेत. धीरेंद्र शास्त्री येण्यापूर्वीच बिहारमध्ये यावरून राजकारण सुरू झाले आहे. पाटणा विमानतळावर बाबाला विरोध करण्यात येणार असल्याची घोषणा वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांनी केली आहे. दुसरीकडे, राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी त्यांना तुरुंगात टाकावे, असे यापूर्वीच म्हटले आहे. त्याचवेळी भाजपकडून राजदवर पलटवार करण्यात येतो आहे. गिरीराज सिंह, अश्विनी चौबे आणि सुशील कुमार मोदी इत्यादी भाजप नेत्यांनी बागेश्वर बाबांच्या भेटीला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : Umesh Pal Murder Case : गुड्डू मुस्लिम आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर; घरावर चालणार बुलडोजर

Last Updated : May 1, 2023, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.