ETV Bharat / bharat

Hike In Expenditure Limit For Assembly Candidates : उमेदवारांचा खिसा फुगला, निवडणूक खर्चाची रक्कम केली 95 लाख

author img

By

Published : Jan 7, 2022, 8:49 AM IST

Updated : Jan 7, 2022, 9:21 AM IST

केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पुर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांमध्ये उमेदवारांना (Hike In Expenditure Limit For Assembly Candidates) करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता लोकसभेसाठी 95 लाख रुपये तर विधानसभेसाठी आता 40 लाख रुपये खर्च करता येणार आहे. (Hike In Expenditure Limit) निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता असते त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला हा खर्च करता येतो.

भारतीय निर्वाचन आयोग
भारतीय निर्वाचन आयोग

मुंबई - निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना आता लोकसभेसाठी 95 लाख रुपये तर विधानसभेसाठी आता (Hike In Expenditure Limit For Lok Sabha candidate) 40 लाख रुपये खर्च करता येणार आहे. हा निर्णय (Hike In Expenditure Limit) मोठ्या राज्यांसाठी लागू राहणार आहे. तर, गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी लोकसभा मतदारसंघात 75 लाख तर विधानसभा मतदारसंघात 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे.

Ani Twitter
Ani Twitter

या अगोदर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. ती आता वाढवून 95 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. तर, विधानसभेसाठी ही मर्यादा 28 लाख रुपये इतकी होती. आता त्यामध्ये वाढ करुन 40 लाख रुपये करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता असते त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला हा खर्च करता येतो.

देशभरात येत्या काही महिन्यांत ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व राज्यांमधील प्रचारसभा आवरत्या घेतल्या आहेत. तर, भाजपासह इतरही काही पक्षांनी आपल्या प्रचारसभांवर मर्यादा घातल्या आहेत. (Hike In Expenditure Limit Lok Sabha candidate) या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

शिफारशींचा आधार घेण्यात आला

निवडणूक आयोगाने यासंदर्भात केलेल्या घोषणेमध्ये केंद्रीय कायदा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेचा हवाला देण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक समितीने केलेल्या शिफारशींचा आधार घेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव

लोकसभेसह विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आगामी ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे.

२० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढ

यामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून आता ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, लहान राज्यांसाठी ही मर्यादा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मतदानाच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता

या नव्या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील उमेदवारांना आता वाढीव खर्च करता येणार आहे. आता येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग मतदानाच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे : नाना पटोले

Last Updated : Jan 7, 2022, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.