ETV Bharat / bharat

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आज होणार पायउतार..? भाजपकडून दलित मुख्यमंत्री नियुक्तीचे संकेत

author img

By

Published : Jul 25, 2021, 3:11 PM IST

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्यापासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल?; याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. आज संध्याकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

bs-yediyurappa-
bs-yediyurappa-

बेलगावी -कर्नाटक भाजपमध्ये सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे वाढते वय पाहता राज्यात नेतृत्व बदलाचा विचार सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री कोण असेल?; याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र पक्षनेतृत्वाकडून अधिकृत नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, असे संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.

बेलगावमधील सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी म्हटले की, आज संध्याकाळपर्यंत राज्यातील नेतृत्व बदलाचा आदेश येऊ शकतो. दलित मुख्यमंत्री नियुक्तीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. मला कोणतीच चिंता नाही”, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.

यावेळी पावसाने झालेल्या नुकसानीविषयी बोलताना येदियुरप्पा यांनी म्हटले की, पावसाने सर्वाधिक नुकसान उत्तर कर्नाटकचे झाले आहे. बेलगावातील सर्व जलाशये पूर्णपणे भरली असून यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने नुकसानग्रस्त भागाचा मी दौरा केला आहे. मागील दोन दिवसापासून पावसाने उसंत घेतली असून पूरपरिस्थिती कमी होत आहे.

आज म्हणजे २६ जुलै येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा शेवटचा दिवस असेल असं बोललं जात आहे. १९८३ साली येडियुरप्पा पहिल्यांदा शिकारीपूरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.