ETV Bharat / bharat

केरळ विधानसभा निवडणूक : भाजप, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची यादी

author img

By

Published : Mar 14, 2021, 7:08 PM IST

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी भाजपाच्या ११२ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. केरळमध्ये भाजपा ११५ जागांवर निवडणूक लढवणार असून, युतीमधील इतर पक्षांसाठी २५ जागा ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती सिंह यांनी दिली. तर, काँग्रेसने आपल्या ८६ उमेदवारांची यादी आज (रविवार) जाहीर केली..

BJP, Cong release list of candidates for Kerala polls
केरळ विधानसभा निवडणूक : भाजप, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची यादी

नवी दिल्ली : केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपा ११५ जागांवर निवडणूक लढवणार असून, काँग्रेसने ८६ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी भाजपाच्या ११२ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. केरळमध्ये भाजपा ११५ जागांवर निवडणूक लढवणार असून, युतीमधील इतर पक्षांसाठी २५ जागा ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती सिंह यांनी दिली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. कासारगोडमधील मंजेश्वर आणि पठामथिट्टामधील कोन्नी मतदारसंघांमधून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. तर नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरण यांना पलक्कडमधून तिकीट मिळाले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन हे नेमोममधून निवडणूक लढवतील. अभिनेते सुरेश गोपी यांना थ्रिस्सूरमधून तिकीट देण्यात आले आहे. अशी माहिती अरुण सिंह यांनी दिली.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर..

काँग्रेसने आपल्या ८६ उमेदवारांची यादी आज (रविवार) जाहीर केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री ओम्मेन चँडी ह पुथुप्पल्लीमधून, तर केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांना हरीपड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेस नेते के. करुनाकरण यंचे पुत्र आणि वडाकारामधील खासदार के. मुरलीधरण यांना नेमोम मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

हेही वाचा : तामिळनाडू विधानसभा निवडणूक : डीएमकेच्या आमदाराचा भाजपामध्ये प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.