ETV Bharat / bharat

Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण

author img

By

Published : May 19, 2023, 3:04 PM IST

Fine On Bageshwar Baba
मनोज तिवारींसह बागेश्वर धाम बाबा

बागेश्वर धाम बाबा आणि बिहार सरकारमध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर बागेश्वर धाम बाबा बिहारमध्ये गेल्यानंतर बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर दंड ठोठावला आहे.

पाटणा : बागेश्वर धाम बाबा आपल्या बेधडक वक्तव्याने नेहमी चर्चेत राहतात. सध्या बागेश्वर धाम बाबा हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबांवर दंड ठोठावला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बागेश्वर धाम बाबांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. बागेश्वर बाबा बिहारमधून मध्य प्रदेशाकडे रवाना झाले असले, तरी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या या दंडाने ते अद्यापही बिहारमध्ये चर्चेत आहेत.

मनोज तिवारी चालवत होते गाडी : बागेश्वर धाम बाबा उर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पाटणा विमानतळावरून तरेत पाली मठात पोहोचले होते. ही गाडी भाजप नेते मनोज तिवारी चालवत होते. मात्र यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बागेश्वर धाम बाबांवर करण्यात आला आहे. पाटणा पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीची चौकशी केली असता हे आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बागेश्वर धाम बाबांवर कारवाई केली.

बागेश्वर धाम बाबांवर दंड : बागेश्वर धाम बाबांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही. त्यांची गाडी भाजपचे खासदार मनोज तिवारी चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. बाबा बाजूला बसले होते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह मागच्या सीटवर बसले होते. त्या गाडीत ना मनोज तिवारींनी सीट बेल्ट लावला होता ना बागेश्वर धाम बाबांनी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई : पाटणा पोलिसांनी सीट बेल्ट न घातल्यामुळे बागेश्वर धाम बाबा प्रवास करत असलेल्या गाडीच्या क्रमांकावरून 1 हजार रुपयांचे चलन कापले आहे. वाहतूक विभागाने तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. बागेश्वर धाम बाबा पाटणा विमानतळावरून पानस हॉटेलमध्ये आले. तेव्हा कारमध्ये कोणीही सीट बेल्ट घातला नव्हता. हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असून त्यामुळे दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

13 ते 17 मे दरम्यान पारायण : विशेष म्हणजे बागेश्वर धाम बाबांचे नौबतपूर येथील तरेत पाली मठ येथे 13 ते 17 मे दरम्यान पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. कडाक्याच्या उन्हातही बागेश्वर बाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि हनुमान कथेचा आनंद घेण्यासाठी दररोज लाखो भक्तांनी गर्दी केली होती. बागेश्वर बाबांना सोडण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानापर्यंत भाविकांची झुंबड उडाली होती.

हेही वाचा -

  1. Kota Online Fraud Case : मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
  2. Karnataka Gov Formation : कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
  3. Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.