ETV Bharat / bharat

Big Breaking news Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 19, 2021, 8:10 AM IST

Updated : Nov 19, 2021, 11:01 PM IST

big breaking news today
big breaking news today

22:59 November 19

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर

कोल्हापूर - अमल महाडिक

धुळे-नंदुरबार - अमरिश पटेल

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम - वसंत खंडेलवाल

मुंबई - राजहंस सिंह

19:57 November 19

त्नाकर बँकेचे अहमदाबादचे प्रादेशिक प्रमुख, कृषी विभाग आणि पुणे बँकेच्या वसुली प्रमुखाला लाच प्रकरणात अटक

सीबीआय कारवाई - रत्नाकर बँक लिमिटेड, अहमदाबादचे प्रादेशिक प्रमुख, कृषी विभाग आणि पुणे बँकेच्या वसुली प्रमुखाला 30 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक

18:11 November 19

काँग्रेस उद्या देशभरात 'किसान विजय दिवस' साजरा करणार

3 शेतीविषयक कायदे रद्द

काँग्रेस उद्या देशभरात 'किसान विजय दिवस' साजरा करणार

शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्साही लढ्याला मान्यता म्हणून विजय दिवस

राज्या-राज्यांमध्ये किसान विजय रॅली/किसान विजय सभा आयोजित करणार

16:25 November 19

नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड या कर्मचाऱ्याची आत्महत्या

नाशिक बेकिंग :-

- नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड या कर्मचाऱ्याची आत्महत्या

- कमी पगार आणि कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

- महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनातही सहभागी होते गायकवाड

- राहत्या घरात गळफास घेऊन संपविले जीवन

- गहिनाथ गायकवाड मूळचे बीड येथील रहिवाशी

- मयत गहिनाथ गायकवाड यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी

15:33 November 19

सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू

अमरावती ब्रेकिंग

अखेर सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू

अमरावती हिंसाचारानंतर बंद करण्यात आली होती इंटरनेट सेवा

इंटरनेट सुरू झाल्याने सहा दिवसांनी दिलासा

अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर

शहरातील संचारबंदी मात्र कायम

14:20 November 19

मुंबई - पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने आजही सुरूच आहेत. सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले. पण अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना त्रिवार वंदन. या आंदोलनात प्राणास मुकलेल्या वीरांना नम्र अभिवादन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

14:17 November 19

  • केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे.
    -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/6Xw3ejYzOH

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  
     

13:31 November 19

मोदी हरलेत आणि पुढेही हरत राहणार; शेतकरी जिंकले, लोकशाही जिंकली - मंत्री यशोमती ठाकूर.

अमरावती - मोदी हरलेत आणि पुढेही हरत राहणार, शेतकरी जिंकले लोकशाही जिंकली! अशा शब्दांत काँग्रेस नेत्या व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कृषी कायदे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज मोदींनी कायदे रद्द केल्याची फक्त घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींनीवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा घोषणा करायची मग म्हणायचे, तो चुनावी जुमला होता. असंही यशोमती ठाकुर म्हणाल्या.

13:11 November 19

जेव्हा-जेव्हा शेतकरी आंदोलन करतो तेव्हा विजय हा शेतकऱ्यांचा होतो - मंत्री सुनील केदार

नागपूर -  जेव्हा-जेव्हा शेतकरी आंदोलन करतो तेव्हा विजय हा शेतकऱ्यांचा होतो त्यामुळे दोन राज्यांच्या निवडणुकी सोबत हा विषय मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली  

केंद्र सरकार ने कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच मागे घेतले, शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना जे शेतकरी यात मृत्युमुखी पडले त्यांना आदरांजली देखील केदार यांनी वाहिली.

12:29 November 19

कोल्हापुरात एसटी आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धक्काबुक्की

  • कोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानकातून पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तीने घेतले ताब्यात
  • पंचगंगा नदीपात्रात जलसमाधी घेण्यासाठी निघालेले एसटी कर्मचारी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
  • आंदोलनाच्या 12 व्या दिवशीही एसटी कर्मचारी आक्रमक
  • आंदोलक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की नंतर 25 आक्रमक आंदोलक ताब्यात
  • पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीने महिला आंदोलकांना भोवळ

11:39 November 19

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा हा विजय आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

10:18 November 19

पंजाब - उत्तर प्रदेशचा पराभव दिसल्यामुळेच सरकारची माघार - संजय राऊत

मुंबई - पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभव दिसत असल्यामुळे केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. संजय राऊत यांची तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया

10:03 November 19

  • तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराचे डोके खाली केले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

09:56 November 19

उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला - राजू शेट्टी

  • कोल्हापूर - तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे
  • देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय
  • कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
  • उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला
  • मोदी सरकारचे केले अभिनंदन

09:37 November 19

अमरावती संचारबंदी : इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता

अमरावती - आठवड्याभरानंतर अमरावतीतल्या संचारबंदीतील शिथिलतेत बदल, जीवनावश्यक वस्तू आणि कृषी दुकानं उघडण्याच्या वेळेत वाढ, इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता

09:30 November 19

नागपूर - महिला पोलिसाची राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

  • नागपूर - शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शिपाई अश्विनी खंडागळे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
  • अश्विनी खंडागळे यांना दिड वर्षाची मुलगी आहे.
  • बऱ्याच दिवसापासून त्या तणावात असल्याचे बोलले जात आहे
  • यापूर्वी त्यांनी आत्महत्येचा तीन वेळा प्रयत्न केला होता

08:24 November 19

  • आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन
  • तसेच आज पंतप्रधान उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचनाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांचे उद्घाटन करतील
  • त्यानंतर ते 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व'साठी झाशीला जाणार आहेत.

08:20 November 19

  • दिल्ली -  सोनिया गांधी यांनी शक्तीस्थळी जाऊन माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना वाहिली आदरांजली

07:35 November 19

Breaking

  • 26 तारखेचा अमित शहा यांचा पुणे दौरा पुढे ढकलण्यात आल्याची भाजप शहराध्यक्ष मुळीक यांची माहिती
Last Updated : Nov 19, 2021, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.