ETV Bharat / bharat

Big Breaking news : TET घोटाळ्यात अटक तुकाराम सुपे निलंबित, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

author img

By

Published : Dec 20, 2021, 6:38 AM IST

Updated : Dec 20, 2021, 9:45 PM IST

Big Breaking news : चरित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर चाकूने वार करत केली हत्या
Big Breaking news : चरित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर चाकूने वार करत केली हत्या

21:40 December 20

TET घोटाळ्यात अटक तुकाराम सुपे निलंबित, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई- शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

21:18 December 20

अनिल परब, परिवहन मंत्री

  • आमच्या चर्चेला प्रतिसाद देत , एसटी कर्मचारी वेतन श्रेणीचे अध्यक्ष अजय गुजर आणि सरचिटणीस यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली
  • चर्चेअंती काही गोष्टी आम्ही मान्य केल्या असल्याचे परिवहन मंत्री परब म्हणाले
  • विलिनीकरणाचा मुद्यावर त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आम्हाला मान्य असेल - परब
  • आर्थिक मागण्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांची मागणी होती की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार हवा
  • आम्ही त्यावर चर्चा करायला तयार आहोत
  • कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आम्ही कारवाई मागे घेऊ
  • फौजदारी कारवाई ज्यांच्यावर झाली आहे, ती कायदेशीर बाबी तपासून मागे घेऊ

21:14 December 20

एसटी संपात फूट, अजय गुजर प्रणित संघटनेची संपातून माघार

मुंबई - एसटी संपात फूट, अजय गुजर प्रणित संघटनेची संपातून माघार

19:30 December 20

  • महाराष्ट्रातील कन्नड लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि कर्नाटकच्या सरकारी वाहनांनाही सुरक्षा प्रदान करण्यासाठी राज्याचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

19:16 December 20

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीतील ईडी कार्यालया बाहेर

  • अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची दिल्लीतील ईडी कार्यालयातल सुरू असलेली चौकशी संपली असून ती कार्यालयाबाहेर आली आहे.

17:18 December 20

  • एसटी संपावर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकली असून 22 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे.

17:00 December 20

जत तालुकाजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात

सांगली - जत तालुकाजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. एका उभ्या असलेल्या ऊस ट्रॉलीला स्विफ्ट चार चाकी आणि दुचाकी गाडी येऊन घडकल्याने हा अपघात घडला आहे.

16:44 December 20

एसटी संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई - एसटी महामंडळाला शासनात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 56 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संप प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहेत. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची संपकऱ्यांची मागणी असल्याने या विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमली असून या समितीचा प्राथमिक अहवाल आज न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. एसटी कामगारांची बाजू न्यायालायत अॅड. गुणरत्न सदावर्ते मांडत आहे.

16:42 December 20

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्ते कामावरून भाजपा आणि इतर पक्षात जुंपली

  • पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1700 कोटींच्या कामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर
  • कमी दराने कामे केल्याने गुणवत्ता राखली जाणार नाही, नागरिकांना चांगले रस्ते द्या भाजपाची मागणी
  • रस्ते कामे लवकर पूर्ण करा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी , समाजवादीची मागणी
  • थर्ड पार्टी ऑडिट, निकृष्ठ कामाबद्दल कंत्राटदार, अभियंत्यांवर कारवाई करा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे प्रशासनाला निर्देश
  • भाजपाच्या विरोधानंतरही 1700 कोटीहून अधिक किमतीचे रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर

16:37 December 20

ऐश्वर्याची दिल्लीच्या ईडी कार्यालयात चौकशी, पनामा पेपर्स लीक प्रकरण भोवणार

दिल्ली / मुंबई - 'पनामा पेपर्स लीक' (Panama Papers leak case ) प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी 'ईडी'ने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिला समन्स पाठवले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी (Aishwarya Rai Bachchan Panama Papers) 'ईडी'ने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावले आहे. तिला आज दिल्लीत बोलावण्यात आले असून तिची 'ईडी'च्या कार्यालयात चौकशी सुरू आहे.

15:30 December 20

सुभाष देसाईंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्याचा वैभव आणि उद्योग गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
  • राज्य सरकारने कोरोना काळातही मोठं काम केले.
  • केंद्रकडून राज्यावर अन्याय होते आहे. आमचं वैभव पळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • आधी फडणवीस सरकार काहीच बोलत नव्हते, आम्ही स्पष्टपणे बोलतो.
  • मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजार करण्यासारखं सगळं काही मुंबईत आहेत.
  • देशाचे आर्थिक केंद्र मुंबईत आहेत.
  • कोणत्याही कंपनीला भारतात काही उद्योग, बँक सुरू करायची असेल तर ती मुंबईत सुरू होते.
  • यासह अमित शाहांनी लावलेल्या विविध आरोपांना सुभाष देसाईंनी उत्तर दिले.

11:54 December 20

तुकाराम सुपेच्या घरात मिळली 2 कोटी रुपयांची कॅश आणि सोने

पुणे ब्रेक

TET परीक्षा घोटाळा प्रकरण

तुकाराम सुपेच्या घरात मिळली 2 कोटी रुपयांची कॅश आणि सोने

यापूर्वी मिळले होते 88 लाख रूपये

दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचे घबाड

घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने केली हस्तगत

सुपे यांच्या घरी पोलीस छापा टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली

मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले

तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत

10:31 December 20

1.52 कोटी रुपयाच्या सोन्याची तस्करी मुंबईत पकडली

मुंबईत विमानतळावर कारवाई

1.52 कोटी रुपयाच्या सोन्याची तस्करी मुंबईत पकडली

कॉफीने भरलेल्या कॉफी फ्लास्कमधून तस्करी

पादत्राणांमध्ये आणि केसांच्या टोपामध्येही लपवून ठेवलेले सोने सापडले

एक सोन्याची पट्टी खाण्यायोग्य वस्तूंमध्ये लपवून ठेवली होती

काही सोने अंडरगारमेंट अस्तरांमध्ये शिवलेले आढळले

एका महिला केनियन प्रवाशाला अटक करण्यात आली आहे

10:23 December 20

न्यूझीलंड दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार

न्यूझीलंड फ्युचर टूर्स प्रोग्रामचा भाग म्हणून डिसेंबर/जानेवारी 2022-23 मध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार

सप्टेंबर 2021 च्या सोडलेल्या दौर्‍याची भरपाई करण्यासाठी एप्रिल 2023 मध्ये 10 व्हाईट-बॉल सामन्यांसाठी परत येणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क्रिकेट बोर्डाची माहिती

10:01 December 20

सेन्सेक्स 1040 अंकांनी घसरून 55,971 वर

मुंबई ब्रेकिंग

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 1040 अंकांनी घसरून 55,971 वर आला आहे.

07:42 December 20

नवाब मलिक यांचे सूचक ट्विट

नवाब मलिक यांचे रविवारचे ट्विट

उद्या सकाळी काही अधिकृत पाहुणे माझ्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे.

मी त्यांचे चहा आणि कुकीजने मनापासून स्वागत करण्यास तयार आहे.

त्यांना योग्य पत्ता हवा असल्यास ते मला कॉल करू शकतात.

07:14 December 20

सोलापूर - विजापूर नाका पोलिसांनी तवेरा कारमधून 1.36 कोटी रुपयांचा 626 किलो गांजा केला जप्त

सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांनी 19 डिसेंबरच्या मध्यरात्री इनोव्हा आणि तवेरा कारमधून 1.36 कोटी रुपयांचा 626 किलो गांजा जप्त केला

दोन आरोपींना NDPS कायद्यान्वये अटक करण्यात आली

सोलापूरचे पोलिस आयुक्त, हरीश बैजल यांची माहिती

06:28 December 20

Big Breaking news : चरित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर चाकूने वार करत केली हत्या

चरित्र्यावर संशय घेत, नवऱ्याने बायकोवर बकरे कापण्याच्या सुरेने भर रस्त्यात सपासप वार करून तीची हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःही तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर, तलावात बुडताना काही तरुणीने नवऱ्याला वाचवून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.

Last Updated : Dec 20, 2021, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.