ETV Bharat / bharat

Top १० @ 7 PM : सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 15, 2020, 1:04 PM IST

Updated : Jun 15, 2020, 7:16 PM IST

सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

top-10-news-at-7-pm
सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

नाशिक - सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दोन तास जोरदार झालेल्या पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली आहे. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची योग्य सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात, दुकानात साचले होते.यासह महत्वाच्या १० बातम्या...

  • नाशिक - सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दोन तास जोरदार झालेल्या पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली आहे. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची योग्य सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात, दुकानात साचले होते.

सविस्तर वाचा - नाशकात मान्सूनपूर्व कामाचे तीन-तेरा; दोन तासाच्या पावसाने दुकानांमध्ये शिरले पाणी

  • मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना रनौतने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर घराणेशाही जोपासल्यामुळे गुणवंत कलाकारांवर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवतो असे म्हटले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करुन सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर असल्याचा आरोप केला आहे. सुशांतसिंह राजपूत गेल्या पाच-सात वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करतोय. त्याला कोणीही गॉडफादर नव्हता त्यामुळे त्याच्या कामाची दखल घेतली गेली नाही, असे कंगना म्हणाली. आजवर त्याला कोणताही पुरस्कार न मिळल्याचा उल्लेख करत फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर तिने टीकास्त्र सोडले आहे.

सविस्तर वाचा - सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर - कंगना रनौत

  • मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी गळफास घेत त्याच्या वांद्रे येथील घरी (दि. 14 जून) आत्महत्या केली. आज त्याच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडिलांनी त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला असून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी तो अनंतात विलिन झाला.

सविस्तर वाचा - सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, वडिलांनी दिला मुखाग्नी

  • नवी दिल्ली - महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विधानावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार, असे आईनस्टाईन यांनी म्हटले होते. देशातील लॉकडाऊनने हे सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.

सविस्तर वाचा- 'अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार, हे लॉकडाउनने सिद्ध केले'


कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्यानंतर कामगारांना घरी पाठवण्याची सोय करण्यात आली. मात्र, आता पुन्हा बांधकाम सुरू करण्यासाठी कामगारच नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे 'स्किल लेबर'ची पोकळी भरून काढण्याचे आव्हान कंत्राटदारांसमोर आहे. यातच बाजारात घरांच्या किमती घसरल्याने संकटाची तीव्रता वाढलीय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक जयदीप राजे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

सविस्तर वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष: 'सद्या मजूर कमी आणि ऑफिस स्टाफ जास्त' - बांधकाम व्यवसायिक जयदीप राजे

  • येवला (नाशिक) - येवल्यात वाढती रुग्ण संख्या बघता तपासणी पथके करून तातडीने 'डोअर टू डोअर' स्क्रिनिंग करण्याचे आदेश, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच सर्वे करताना केवळ मलमपट्टी नको तर तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा- येवल्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 'डोअर टू डोअर' तपासणी करा - छगन भुजबळ

  • मुंबई - २३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईतील मोठ्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

सविस्तर वाचा - मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या गुन्ह्यांमध्ये घट; मात्र सायबर गुन्हेगारांचे फावले

  • नवी दिल्ली - पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयाचे दोन कनिष्ठ अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते दोघेही गाडीने उच्चायुक्तालयातून ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, ते आपल्या कार्यस्थळी पोहोचले नाही.

सविस्तर वाचा -पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाचे दोन अधिकारी बेपत्ता?

  • रत्नागिरी - हौसेला मोल नाही, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण रत्नागिरीत एकाने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला आहे. सध्या या व्यक्तीची आणि त्यांच्या मास्कची चर्चा अख्ख्या रत्नागिरीत रंगली आहे.

सविस्तर वाचा - हौसेला मोल नाही, 'ते' वापरतात चक्क चांदीचा मास्क

  • मुंबई - कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्राच्या आयोजनाबाबत बीसीसीआयचे मत विभागले गेले आहे. काहींनी ही स्पर्धा भारतात तर काहींनी भारताबाहेर खेळवण्याची मागणी केली. परंतू आयपीएलच्या फ्रेंचायझींनी ही स्पर्धा भारतातच व्हावी असे मत दिले आहे. भारतात परिस्थिती सुधारली नाही तर बाहेरच लीगचे आयोजन करणे हा एक उपाय ठरू शकतो, असे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी म्हटले.

सविस्तर वाचा - 'डेस्टिनेशन वेडिंग' कुटुंबाशिवाय होत नाही, फ्रेंचायझींनी दिले स्पष्ट मत

  • मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री दुःखी झाली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींनी सोशल मीडियावरुन आपल्या दुःखाला वाट करुन दिलीय. अशात अभिनेता अर्जुन कपूर याने लिहिलेली पोस्ट सर्वांना चकित करणारी आहे. त्याने सुशांतसोबत झालेल्या चॅटचा एक स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केलाय. ही त्यांची बातचीत १८ महिन्यांपूर्वीची आहे.

सविस्तर वाचा- सुशांतसोबतचा शेवटचा मेसेज अर्जुन कपूरने शेअर करीत लिहिली ह्रदयस्पर्शी पोस्ट

Last Updated : Jun 15, 2020, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.