बंगळुरू - शहरातील जीवन भीमा नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मुरूगेश पल्या भागातील 3 आरोपींना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर या आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या सर्व प्रकारामुळे जे 24 पोलीस या आरोपींच्या संपर्कात आले होते त्याचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुरूगेश पल्या भागातील 3 आरोपींना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक करून त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी केली. यावेळी काही पोलीस त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी या सर्व 24 पोलिसांना अलग ठेवण्यात आले आहे आणि पोलीस ठाणेही तत्काळ शहरातील दुसर्या ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस खात्याने दिली आहे.