ETV Bharat / bharat

'गुजरातमध्ये दारुबंदी असूनही घराघरांत दारू पिली जाते.. '

author img

By

Published : Oct 7, 2019, 8:08 AM IST

Updated : Oct 7, 2019, 11:36 AM IST

राजस्थानमध्ये दारुबंदी करण्यास माझे समर्थनच असेल, मात्र त्यामुळे बेकायदेशीर दारूबंदीचे प्रमाण वाढेल. तेव्हा, त्यासंदर्भात ठोस उपाययोजना केल्याशिवाय दारूबंदी करण्याला अर्थ नाही. तसेच गुजरातमध्ये दारूबंदी करूनही घराघरांमध्ये दारू पिली जाते, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

Ashok Gehlot on liquor ban

जयपूर - दारूबंदीला माझे वैयक्तिक समर्थन आहे. याआधीही गुजरातमध्ये दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ती यशस्वी झाली नाही. गुजरातच्या घराघरांत आज दारू पिली जाते, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

  • Rajasthan CM Ashok Gehlot on liquor ban: Personally I support liquor ban, it was banned once but it failed&ban was removed. Liquor has been banned in Gujarat since independence but it's Gujarat where consumption of liquor is the highest,ghar-ghar mein sharab pi jaati hai. (06.10) pic.twitter.com/fLFkNAZ0IC

    — ANI (@ANI) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच ते म्हणाले, की गुजरातमध्ये स्वातंत्र्यानंतरच दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, आज अशी परिस्थिती आहे, की गुजरातमध्येच सर्वात जास्त दारूचा खप होतो आहे. गुजरातच्या घराघरांमध्ये दारू पिली जाते. गांधींच्या गुजरातची आज ही परिस्थिती झाली आहे. दारुबंदीचे स्वागतच आहे, मात्र काही ठोस उपाय केल्याशिवाय दारुबंदीचा काही फायदा होईल, असे वाटत नाही.

राजस्थानमध्ये दारुबंदी करण्यास माझे समर्थनच असेल, मात्र त्यामुळे बेकायदेशीर दारुबंदीचे प्रमाण वाढेल. तेव्हा, त्यासंदर्भात ठोस उपाययोजना केल्याशिवाय दारुबंदी करण्याला अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी गुजरातची दारुबंदी कशी फसली आहे याचा दाखला दिला.

हेही वाचा : विगमध्ये लपवले तब्बल एक किलो सोने; कालिकत विमानतळावर तस्कराला अटक

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 7, 2019, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.