ETV Bharat / bharat

'सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही', राहुल गांधींची टीका

author img

By

Published : Dec 19, 2019, 8:30 PM IST

देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. प्रदर्शनाला पाठिंबा देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. प्रदर्शनाला पाठिंबा देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकाराला ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्याचा आणि शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा अधिकार नाही, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • This government has no right to shut down colleges, telephones & the Internet, to halt metro trains and to impose #Section144 to suppress India's voice & prevent peaceful protests.

    To do so is an insult to India’s soul.

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) 19 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताचा आवाज दडपण्यासाठी आणि आंदोलने रोखण्यासाठी केंद्र सरकारला मेट्रो, दूरध्वनी , इंटरनेट, शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा तसेच राज्यामध्ये कलम 144 लागू करण्याचा अधिकार नाही. असे करणे म्हणजे भारताच्या आत्म्याचा अपमान आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.हेही वाचा - पाकिस्तानातून आलेल्या महिलेला मिळाले भारतीय नागरिकत्व

नागरिकात सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच दिल्लीमधील 15 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती.


हेही वाचा - 'आंदोलकाचा आवाज जितका दाबाल तितकाच तो मोठा होत जाईल', प्रियंका गांधींचे टि्वट

Intro:Body:



'सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही', राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली -  देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. प्रदर्शनाला पाठींबा देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकाराला ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्याचा आणि शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा अधिकार नाही, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

भारताचा आवाज दडपण्यासाठी आणि आंदोलने रोखण्यासाठी केंद्र सरकारला मेट्रो, दूरध्वनी , इंटरनेट, शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा तसेच राज्यामध्ये कलम 144 लागू करण्याचा अधिकार नाही. असे करणे म्हणजे भारताच्या आत्म्याचा अपमान आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -

नागरिकात सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच दिल्लीमधील 15 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती.

हेही वाचा -




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.