ETV Bharat / bharat

'इंडिया ग्लोबल वीक २०२०' : पंतप्रधान मोदी जगाला करणार संबोधित..

author img

By

Published : Jul 7, 2020, 10:29 PM IST

यासोबतच, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचीही भाषणे या परिषदेमध्ये होणार आहेत.

PM Modi to make major worldwide address to India Global Week in UK
'इंडिया ग्लोबल वीक २०२०' : पंतप्रधान मोदी जगाला करणार संबोधित..

लंडन : गुरुवारपासून लंडनमध्ये सुरू होत असलेल्या 'इंडिया ग्लोबल वीक २०२०' मध्ये पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते जगाला संबोधित करतील. भारतातील व्यापार आणि परराष्ट्र गुंतवणूकीसंबंधी विषयावर ते भर देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यासोबतच, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचीही भाषणे या परिषदेमध्ये होणार आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही तीन दिवसीय परिषद व्हर्च्युअली होणार आहे. यामध्ये इंग्लंडकडून प्रिन्स चार्ल्स हे जगाला संबोधित करतील. यासोबतच परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब, गृह सचिव प्रिती पटेल, आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव लिझ ट्रुस यांचीही भाषणे यात होतील.

हेही वाचा : भारत-चीन संघर्ष झाल्यास अमेरिका भारतासोबत, व्हाइट हाऊसची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.