ETV Bharat / bharat

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...! बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा

author img

By

Published : Aug 4, 2019, 5:53 PM IST

मैत्री दिनाचे औचित्य साधून इस्त्रायलच्या दुतवास विभागाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ टि्वट केला आहे.

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...!

नवी दिल्ली - मैत्री दिनाचे औचित्य साधून इस्त्रायलच्या दुतवास विभागाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ टि्वट केला आहे. आपली मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी आणि अधिक शिखर गाठण्यासाठी भारताला मैत्री दिनाच्या शुभेच्छा, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


इस्त्रायलच्या दुतवास विभागाने टि्वट केलेल्या या व्हिडीओमध्ये नेतान्याहून आणि मोदी यांच्या भेटीचे काही छायाचित्रे पाहायला मिळतात. या व्हिडीओला शोले चित्रपटातील गाजलेले 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' या गाण्याची जोड दिली आहे.

  • תודה לך
    מאחל יום חברות שמח לאזרחי ישראל הנהדרים ולידידי הטוב @netanyahu

    הודו וישראל הוכיחו את ידידותם לאורך הזמן. הקשר שלנו הוא חזק ונצחי. מאחל שהידידות בין המדינות שלנו תצמח ותפרח אף יותר בעתיד https://t.co/PsZTgMoXMU

    — Narendra Modi (@narendramodi) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्त्रायलचे हे टि्वट रिटि्वट केले आहे. शुभेच्छांसाठी धन्यवाद! इस्त्रायलच्या नागरिकांना आणि माझे मित्र बेंजामिन नेतन्याहू यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. आपले बंधन दृढ आणि शाश्वत आहे. येत्ता काळात आपल्या राष्ट्रांची भरभराट होवो, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकाचा पराभव करून देशात मोदींनी सत्ता स्थापन केली. यावर सर्वांत अगोदर नेतान्याहू यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. 2017 मध्ये नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी नेतान्याहून मोदींचे स्वागत करण्यासाठी स्व:ता विमानतळावर गेले होते.

Intro:Body:

national


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.