ETV Bharat / bharat

#CAA आंदोलन : अलिगढमधील इंटरनेट सेवा बंद; मुस्लीम विद्यापीठाच्या सुट्ट्याही तातडीने जाहीर

author img

By

Published : Dec 15, 2019, 11:06 PM IST

Updated : Dec 15, 2019, 11:37 PM IST

काही वेळापूर्वी पोलीस आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी यांच्यामध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला होता. त्यानंतर आता अलीगढ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

#CAA protest in Aligarh Muslim university
#CAA protest in Aligarh Muslim university

लखनऊ - देशभराप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर विद्यापीठाचे कामकाज ५ जानेवारीला सुरू होईल. सर्व परीक्षादेखील त्यानंतरच आयोजित केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठाचे रजिस्ट्रार अब्दुल हमीद यांनी दिली आहे.

  • Aligarh Muslim University (AMU) Registrar, Abdul Hamid: In view of the current situation, we have declared winter vacations today onwards. University will reopen on January 5 and examinations will be held after that. https://t.co/vXVbnvGO7I

    — ANI UP (@ANINewsUP) December 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही वेळापूर्वी पोलीस आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी यांच्यामध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला होता. याबाबत बोलताना हमीद म्हणाले, की काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर विद्यापीठातील वातावरण गंभीर आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आहे.

इंटरनेट सेवाही बंद..

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही अफवा पसरू नये असे कारण पुढे करत अलीगढ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रविवार रात्री १० पासून सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : #CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा बंद

Intro:Body:

#CAA आंदोलन : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या सुट्ट्या तातडीने जाहीर

लखनऊ - देशभराप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, अलिगढ मुस्लीम विद्यापिठाच्या हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर विद्यापीठाचे कामकाज ५ जानेवारी रोजी सुरु होईल. सर्व परिक्षादेखील त्यानंतरच आयोजित केल्या जातील, अशी माहिती विद्यापिठाचे रजिस्ट्रार अब्दुल हमीद यांनी दिली आहे.

काही वेळापूर्वी पोलीस आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी यांच्यामध्ये झटापट झाली होती. पोलीसांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला होता. याबाबत बोलताना हमीद म्हणाले, की काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर विद्यापीठातील वातावरण गंभीर आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आहे.


Conclusion:
Last Updated : Dec 15, 2019, 11:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.