ETV Bharat / bharat

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात छत्तीसगडमध्ये जवानाला वीरमरण

author img

By

Published : Jul 27, 2020, 1:46 PM IST

धौडाई ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजता करिया मेटा छावणीवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी जवानांनी नक्षवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याबाबतची पुष्टी बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदरराज यांनी दिली आहे.
संग्रहित
संग्रहित

रांची – नारायणपूर जिल्ह्यातील धुर नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या छावणीवर हल्ला केला आहे. करिया मेटा येथील छावणीवर झालेल्या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले आहे. जितेंद्र बागडे असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

धौडाई ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजता करिया मेटा छावणीवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी जवानांनी नक्षवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याबाबतची पुष्टी बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदरराज यांनी दिली आहे.

कांकेरमध्ये नक्षलवाद्यांनी 'शहीद सप्ताह' बाळगण्याचे केले जाहीर

कांकेरच्या ताडोनी ठाण्याच्या क्षेत्रात नक्षलवाद्यांनी फलक लावले आहेत. यामध्ये पोलिसांबरोबरी चकमकीत मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांचे फोटो आणि त्यांच्याविषयी पत्रकात नमूद केले आहे. नक्षलवाद्यांनी 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात नक्षलवाद्यांनी बॅनर लावलेले समजताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध अभियान सुरू केले आहे.

लोन वर्राटू अभियानाने नक्षलवादी झाले सैरभैर

नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आमाबेडा परिसरातील सेमर गावात लाकडाचे स्मारक लावण्यात आले होते. त्यावर काही नावे लिहण्यात आली आहेत. त्यावर दंतेवाडा पोलिसांनी सुरू केलेल्या लोन वर्राटू अभियानाविरोधात नक्षलवाद्यांनी मजकूर लिहिला आहे. या अभियानात नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अभियानात पोलिसांना चांगले यश मिळत आहे. अनेक नक्षलवादी अभियानाने प्रेरित होवून मुख्य प्रवाहात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.