ETV Bharat / bharat

अंगणात क्रिकेट खेळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

author img

By

Published : May 3, 2020, 3:44 PM IST

आंतरराष्ट्रीय स्पोर्टस वाहिनी ESPNने त्यांच्या फेसबुक खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'जॉय ऑफ क्रिकेट' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे.

Elderly couple plays cricket in backyard
वयोवृद्ध जोडपे क्रिकेट खेळताचा व्हिडिओ व्हायरल

तिरुअनंतपूरम - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आबालवृद्धांसह सर्वजण घरामध्ये अडकून पडले आहेत. काहीजण तणावाचा सामना करत आहेत. मात्र, केरळच्या पलक्कड येथील एका वयोवृद्ध जोडपे लॉकडाऊनमध्येही आनंद शोधत आहे. दोघेजण घराच्या अंगणामध्ये क्रिकेट खेळून आपला वेळ घालवत आहे. त्यांच्या क्रिकेट खेळताना व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

अंगणात क्रिकेट खेळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स वाहिनी ESPNने त्यांच्या फेसबुक खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'जॉय ऑफ क्रिकेट' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे. रमण नंबुधरी आणि पत्नी बिंदु ओळुकिल या दोघांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ त्यांच्या मुलाने रेकॉर्ड करून सोशल मीडियावरून शेअर केला. नंबुधरी या शिक्षिका आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.