ETV Bharat / bharat

केरळ : चक्रीवादळ बुरेवी रामनाथपुरमवर स्थिर, 5 जिल्ह्यांत सार्वजनिक सुट्टी जाहीर

author img

By

Published : Dec 4, 2020, 12:35 PM IST

राज्यातील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पटणमथिट्टा, आलाप्पुझा आणि इडुक्की या जिल्ह्यांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात 2 हजारांहून अधिक मदत शिबिरे उघडली आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह सर्व सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीतही आपात्कालीन सेवा आणि निवडणूक संबंधित सेवा सुरू राहतील. आंतरराष्ट्रीय विमानतळ 4 डिसेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद राहील.

चक्रीवादळ बुरेवी न्यूज
चक्रीवादळ बुरेवी न्यूज

तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने शुक्रवारी पाच जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून जसजसे हे वादळ जमिनीच्या दिशेने सरकेल, तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे या वादळाच्या टप्प्यात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

केरळ : चक्रीवादळ बुरेवी रामनाथपुरमवर स्थिर, 5 जिल्ह्यांत सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बुरेवी 4 डिसेंबरला केरळमध्ये जमिनीकडे सरकेल. यामुळे विभागातर्फे दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या भागांत 'रेड अलर्ट' आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - भुवनेश्वरच्या कान्हूचं मोरांशी आहे अनोखं नातं..!

'हे' आहेत पाच जिल्हे

राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पटणमथिट्टा, आलाप्पुझा आणि इडुक्की या जिल्ह्यांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केरळमध्ये 2 हजारांहून अधिक मदत शिबिरे उघडली गेली आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह सर्व सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

'या' सेवा राहतील सुरू

मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीतही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित सेवा, आपात्कालीन सेवा आणि निवडणूक संबंधित सेवा सामान्यपणे कार्यरत राहतील, असे म्हटले आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ 4 डिसेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद राहील.

वादळाचा मार्ग तिरुअनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांच्या सीमाभागातून होईल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. सरकार विविध विभाग आणि सैन्य यांच्यासह आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - भारतीय नौदल दिवस : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.