ETV Bharat / bharat

कर्नाटक होणार 'ग्लोबल बायोटेक हब'; 5 हजार कोटींच्या लाईफ सायन्स पार्कची पायाभरणी

author img

By

Published : Jul 29, 2020, 6:32 PM IST

52 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. सरकारी आणि खासगी गुंतवणुकीतून(पीपीपी) या लाईफ लायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बंगळुरु- कर्नाटक सरकार जैवतंत्रज्ञान (बायोटेक) क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा लाईफ सायन्स पार्क उभारत आहे. बंगळुरु शहराच्या दक्षिणेेकडील निमशहरी भागातील टेक सिटी परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे राज्यात 50 हजार रोजगार तयार होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

52 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. सरकारी आणि खासगी गुंतवणुकीतून(पीपीपी) या लाईफ लायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. 90 लाख स्क्वेअर किलोमीटर जागेवर विविध कंपन्या उभ्या राहणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2022 च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील दिडशे कंपन्या येथे येणार असल्याचे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाची कल्पना 2 दशकांपूर्वीची आहे. स्टेट व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षा आणि बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मुजूमदार शॉ यांनी ही कल्पना मांडली होती. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जागतिक स्तरावरील बायोेटेकनॉलॉजी क्षेत्रात प्रगती होण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावीत होता. आता या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.