ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांमध्ये आढळले तब्बल 62 हजार 64 नवे रुग्ण ; तर 1 हजार जणांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 10, 2020, 11:52 AM IST

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख 15 हजार 75 झाला आहे, यात 6 लाख 34 हजार 945 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 15 लाख 35 हजार 744 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 44 हजार 368 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 22 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 62 हजार 64 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख 15 हजार 75 झाला आहे, यात 6 लाख 34 हजार 945 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 15 लाख 35 हजार 744 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 44 हजार 368 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 1 लाख 45 हजार 865 सक्रिय रूग्ण असून 17 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत 119 नव्या मृतांची नोंद झाली असून एकूण आकडा 4 हजार 927 वर पोहचला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 4 हजार 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमध्ये 3 हजार 198, गुजरातमध्ये 2 हजार 652 , उत्तर प्रदेश 2 हजार 69 , पश्चिम बंगाल 2 हजार 59 जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान देशभरामध्ये आतापर्यंत 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 4 लाख 77 हजार 23कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.