ETV Bharat / bharat

ISIS दहशतवादी संघटनेशी संबधीत दाम्पत्याला अटक; सीएए आंदोलनाशी धागेदोरे

author img

By

Published : Mar 8, 2020, 6:45 PM IST

जहांजीब सामी आणि पत्नी हिना बशीर अशी अटक केलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. सीएए विरोधी आंदोलन करण्यासाठी नागरिकांना भडकावत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

delhi police
दिल्ली पोलिसांनी दाम्पत्यांना केली अटक

नवी दिल्ली - 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‌ॅड सिरिया' म्हणजेच इसीस संघटनेशी संबध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी काश्मीरमधील दांम्पत्याला दिल्लीतील ओखला परिसरातून अटक केली आहे. दिल्लीमध्ये उफाळलेल्या सीएए विरोधी आंदोलनामध्ये दोघांचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अफगाणिस्तानमधील इसीसच्या खोरासन प्रांतातील संघटनेशी त्यांचे संबध असल्याचे तपासात पुढे आले आहे. या संघटनेला खोरासन मॉड्यूल असेही म्हटले जाते.

जहांजीब सामी आणि पत्नी हिना बशीर अशी अटक केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. सीएए विरोधी आंदोलन करण्यासाठी नागरिकांना भडकावत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आंदोलन भडकावणाऱ्यांचा पोलीस मागील काही दिवसांपासून शोध घेत होते. त्यानुसार आज (रविवारी) दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक केली.

दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याची शक्यता

दोघेजण अफगाणिस्तानातील खोरासन प्रांत या इसीसच्या संलग्न संघटनेच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सीएए आंदोलनात तरुणांना भडकावत हिंसा पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलीस तपासात अनेक गोष्टी बाहेर येणार

इसीसशी संलग्न असलेल्या एका दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष तपास पथक याबाबत सखोल चौकशी करत आहे. त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, त्यांना कोठून आदेश मिळत होते, मदत कोठून मिळत होती, अशा प्रश्नांचा पोलीस उलगडा करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.