ETV Bharat / bharat

अम्फान वादळ : पश्चिम बंगालच्या मदतीला ओडिशाने पाठवले ५०० जणांचे पथक

author img

By

Published : May 24, 2020, 8:31 AM IST

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ट्विट करत पश्चिम बंगालच्या मदतीसाठी 500 जणांचे आपत्ती निवारण पथक पाठवले असल्याचे जाहीर केले.

odhisha sent 500 member to rescue work in bengal
बंगालमध्ये मदत कार्यासाठी ओडिशा ने पाठवले 500 जवान

भुवनेश्वर- पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी ओडिशा सरकारने ५०० जणांचे आपत्ती निवारण पथक पाठवले आहे. अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला मोठा तडाखा बसला आहे.आपत्तीच्या काळात आम्ही पश्चिम बंगालच्या सोबत आहोत, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ट्विट करून म्हटले आहे.

ओडिशाने 300 अग्निशामन दलाचे जवान तर ओडिशा आपत्ती निवारण पथकाच्या दहा तुकड्या पश्चिम बंगालला पाठवल्या आहेत.

  • #CycloneAmphan is one of the worst disasters to hit #WestBengal. The people of #Odisha stand by #WestBengal during this unprecedented crisis. Odisha has sent a team of 500 members, including 300 fire personnel & 10 ODRAF teams to assist in relief & rescue operations.#OdishaCares

    — Naveen Patnaik (@Naveen_Odisha) May 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

५०० आपत्ती निवारण पथकाचे जवान आणि अग्निशामन दलाचे जवान कोसळून पडलेली झाडे कापण्यासाठीचे लागणारे साहित्य घेऊन शेजारील राज्य पश्चिम बंगालमध्ये मदत कार्यासाठी गेल्याचे राज्य मदत व पुनर्वसन विभागाचे आयुक्त प्रदीप जेना यांनी सांगितले. वादळामुळे सर्वात जास्त फटका बसलेल्या ठिकाणी आम्ही पाठवलेले पथक रस्ते वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी रस्त्यावर कोसळलेली झाडे हटवून रस्ते साफ करण्याचे काम करणार आहे, असे जेना म्हणाले.

ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना अम्फान वादळाचा तडाखा बसला आहे. केंद्र सरकारने ओडिशा राज्याला 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा राज्यातील आपत्तीग्रस्त भागाचा हवाई दौरा केल्यानंतर एका दिवसाने ही घोषणा करण्यात आली. प्रदीप जेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मदतीसाठी आभार मानले आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.