ETV Bharat / bharat

काँग्रेसच्या 'या' मुस्लीम आमदाराने घेतली संस्कृतमध्ये शपथ

author img

By

Published : Nov 23, 2020, 5:44 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले. आज नव्या आमदारांनी शपथग्रहण केली. यावेळी काँग्रेसचे आमदार शकील अहमद यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

शकील अहमद
शकील अहमद

पाटणा - नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी बिहार विधानसभेत सुरू आहे. शपथ कोणत्या भाषेत घेतली, या मुद्यांवरूनही राजकारण रंगलंय. आमदारकीची शपथ घेताना एमआयएमचे नेते अख्तरुल इमान यांनी हिंदुस्थान शब्दाऐवजी भारत हा शब्द उच्चारण्यास परवानगी मागितली. तर दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार शकील अहमद यांनी संस्कृतमध्ये शपथ घेऊन सर्वांना चकित केले.

काँग्रेसचे आमदार शकील अहमद यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली

काँग्रेसचे आमदार शकील अहमद यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली आहे. ईटीव्ही भारतशी खास संभाषणादरम्यान शकील अहमद म्हणाले की, संस्कृत ही सर्व भाषांची मातृभाषा आहे. संस्कृत भाषेपासून इतर भाषांचा उद्भव झाला आहे. मी संस्कृतचा खूप आदर करतो, म्हणून मी संस्कृतमध्ये शपथ घेतली. मी कोणत्याही कट्टरपंथीला घाबरत नाही, माझ्याविरुद्ध फतवा काढल्यास मला त्यांची चिंता नाही, असे ते म्हणाले.

बिहार विधानसभेत आज स्थानिक भाषेत अनेक आमदारांनी शपथ घेतली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी आपल्या शपथविधीदरम्यान अध्यक्षांना हिंदुस्थानच्या जागी भारत हा शब्द उच्चारण्याची परवानगी मागितली. तर त्यावरून भाजपाने टीका केली. त्यांना हिंदुस्थान पंसत नाही. तर त्यांनी पाकिस्तानात जावे, असे भाजपाचे आमदार प्रमोद कुमार यांनी म्हटलं. यावर भारत कोणाच्या बापाचा नाही, अशी प्रतिक्रिया अख्तरुल इमान यांनी दिली.

'या' नेत्यांनी घेतली संस्कृतमधून शपथ -

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सुषमा स्वराज, उमा भारती आणि हर्षवर्धन यांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. तर 17 व्या लोकसभेचे पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदार उन्मेष पाटील यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. जून 2019 मध्ये भोपाळमधून भाजपाच्या खासदार असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. 1991 मध्ये तत्कालिन लोकसभा सभापती डॉ. बलराम जाखड यांच्यासह 53 सदस्यांनी संस्कृतमधूनच संसद सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, जनता दल, शिवसेनेच्या सदस्यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.