ETV Bharat / bharat

भाजप सरकार देशाला दिवाळखोरीकडे ढकलतयं, देशात आर्थिक आणीबाणी - काँग्रेस

author img

By

Published : Aug 28, 2019, 10:28 AM IST

Updated : Aug 28, 2019, 10:51 AM IST

सरकारच्या योजना देशाला दिवाळखोरीकडे ढकलत आहे, अशी टीका काँग्रेस नते आनंद शर्मा यांनी भाजपवर केली.

काँग्रेस नते आनंद शर्मा

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला दिलेल्या आर्थिक मदतीवरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भारत पहिल्यांदाच सर्वात मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. त्यातच सरकारच्या योजना देशाला दिवाळखोरीकडे ढकलत आहे, अशी टीका काँग्रेस नते आनंद शर्मा यांनी भाजपवर केली. ते दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बोलत होते.

हेही वाचा - मंदीचे सावट.. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण, गेल्या ५२ आठवड्यातील निचांक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटींचा आकस्मिक निधी दिला, त्या पार्श्वभूमीवर सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचे भाजप सरकार ढिसाळ व्यवस्थापन करत आहे. आताची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वाच्या विषयांपासून लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला आर्थिक मदत केली. उद्या जागतिक स्तरावर आर्थिक संकट आले तर रिझर्व्ह बँक देशाला मदत करू शकणार नाही. त्यामुळे आत्ताची परिस्थिती भयंकर आहे, असे शर्मा म्हणाले.

हेही वाचा - पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयमधून पैसे चोरले; राहुल गांधींचा आरोप

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि उर्जित पटेल दोघांनी आकस्मिक निधी सरकारला देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या बिमल जालान समितीने निधी देण्याची शिफारस केली होती. यावेळी बोलताना त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावरही टीका केली. आधीच्या गव्हर्नरांनी जे केले नाही, ते दास यांनी केल्याचे ते म्हणाले.

या निर्णयावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सरकारने नवा मार्ग शोधल्याचे ते म्हणाले. यातून फक्त डॉलरची किंमत वाढणार असून रुपयाचे अवमुल्यांकन होणार आहे. देशामध्ये बरोजगारी वाढली असून त्यासाठी ४ लाख कोटींचा रोजगार निधी सरकार का निर्माण करत नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. असंघटीत क्षेत्रामध्ये असंख्य अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा सरकारने प्रयत्न करावा, असे ओवेसी म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.