ETV Bharat / bharat

आसाम विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन राजकीय पक्ष उदयास

author img

By

Published : Aug 26, 2020, 7:14 PM IST

आसामध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये नवीन राजकीय पक्ष उदयास येत आहेत.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/26-August-2020/8566665_323_8566665_1598448476430.png
आसाम विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली - आसामध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये नवीन राजकीय पक्ष उदयास येत आहेत. राज्यसभा सदस्य आणि प्रख्यात आसामी पत्रकार अजित भुयान यांनी अंचलिक मोर्चाची स्थापना केली आहे. तर अदिप फुकण यांच्या नेतृत्वात असम संग्राम मंच स्थापन करण्यात आला आहे. तसेच ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (एएएसयू) राजकीय पर्याय तयार करण्यासाठी समाजातील विविध विभागांसमवेत कार्यरत आहे.

आसाम विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन राजकीय पक्ष उदयास

राज्यात विविध पक्ष स्थापन होत आहे. असे वेग-वेगळे पक्ष स्थापन झाल्यास ते संघटीत पक्षाविरोधात लढा देऊ शकणार नाहीत. यासाठी सर्वांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचे कलागुरु बिष्णू प्रसाद राभा यांचे पूत्र पृथ्वीराज रभा म्हणाले.

दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार असून येत्या निवडणूकामध्ये भाजपकडून माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचे नावावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये काहीच महिन्यांचा काळ राहिला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.