ETV Bharat / bharat

Zafaryab Jilani Death : बाबरी मशीद कृती समितीचे अध्यक्ष जफरयाब जिलानी यांचे निधन, अयोध्या खटल्यात होते मुस्लिम पक्षाचे वकील

author img

By

Published : May 17, 2023, 9:12 PM IST

ज्येष्ठ वकील आणि बाबरी मशीद कृती समितीचे अध्यक्ष जफरयाब जिलानी यांचे बुधवारी लखनऊमध्ये निधन झाले. त्यांनी अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडली होती.

Zafaryab Jilani
जफरयाब जिलानी

लखनऊ : बाबरी मशीद खटल्यात वकील असलेले जफरयाब जिलानी यांचे बुधवारी दुपारी 12 वाजता लखनऊ येथे निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जिलानी यांनी निशात रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुलगा नजफ जिलानी यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जफरयाब जिलानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव होते. तसेच ते बाबरी मशीद कृती समितीचे अध्यक्षही होते. त्यांनी उत्तर प्रदेशचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले आहे.

बऱ्याच दिवसांपासून आजारी होते : नजफ जिलानी यांनी सांगितले की, अचानक त्यांच्या रक्तदाबात चढ - उतार होऊ लागले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना लघवीचा त्रास होता. लघवीच्या संसर्गाव्यतिरिक्त त्यांना 2021 मध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता. डॉ. रविशंकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.

रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडली होती : ज्येष्ठ वकील जफरयाब जिलानी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी बाबरी मशीद कृती समितीची बाजू मांडली होती. त्यांनी या प्रकरणात बाबरी मशीद कृती समितीच्या वतीने वकिली केली होती. त्यांनी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जफरयाब जिलानी यांना बाबरी मशीद कृती समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त एडीजी म्हणूनही काम केले होते.

मुस्लिम धर्मगुरूंनी शोक व्यक्त केला : मे 2021 मध्ये वकील जफरयाब जिलानी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी जफरयाब जिलानी यांनी लखनौच्या निशातगंज येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर मुस्लिम धर्मगुरूंनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. Passenger Smoking In Flight : विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी प्रवाशावर गुन्हा दाखल
  2. Police Who Did Not Sleep : काय सांगता! हे पोलीस शंभर वर्षांपासून झोपले नाहीत..जाणून घ्या कसे
  3. Adani Hindenburg Case : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदतवाढ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.