ETV Bharat / bharat

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अधीर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्यात टि्वटर वॉर

author img

By

Published : Mar 3, 2021, 9:49 AM IST

अधीर रंजन चौधरी -आनंद शर्मा
अधीर रंजन चौधरी -आनंद शर्मा

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केल्याने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्यात टि्वटर वॉर सुरू आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राज्यात काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) पक्षाशी युती केल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. यावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्यात टि्वटरवॉर सुरू आहे.

काँग्रेस सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरोधात नेहमी लढत आला आहे. आयएसएफ सारख्या कट्टरंपथी पक्षासोबत युती करण्यापूर्वी कार्यकारी समितीमध्ये चर्चा करायला हवी होती, जी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे, असे टि्वट आनंद शर्मा यांनी केले आहे. यावर चौधरी यांनी सलग चार टि्वट करत पलटवार केला.

डाव्या पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व सीपीआय(एम) करत आहे. या युतीचा काँग्रेस एक भाग आहे. भाजपाचे जातीयवादी, फूट पाडणारे राजकारण आणि निरंकुश राजवटीचा पराभव करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. काँग्रेसला जागांचा हिस्सा मिळाला आहे. डाव्या आघाडीने नव्याने स्थापन झालेल्या भारतीय सेक्युलर फ्रंट-आयएसएफला आपल्या हिस्स्यातून जागा वाटप केल्या आहेत. सीपीएमच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या निर्णयाला ‘जातीय’ म्हणणे, ही केवळ भाजपाची सेवा आहे, असे टि्वट चौधरी यांनी केले आहे.

भाजपाविरूद्ध लढा देण्यास कटिबद्ध असलेल्यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवावा आणि भाजपाच्या अजेंडाच्या अनुषंगाने टीका करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पाच राज्यांत पक्षासाठी प्रचार करावा, असा टोलाही त्यांनी आनंद शर्मा यांना लगावला आहे.

मोदींचे कौतुक थांबवा -

जम्मूमध्ये काँग्रेसच्या जी-23 नेत्यांनी भरवलेल्या संमेलनात माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींची स्तुती केली होती. यावरही अधीर रंजन चौधरी यांनी हल्लाबोल केला. वैयक्तिक लाभाचा मोह सोडून पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळण्यात वेळ दवडू नका. तुम्हाला मोठे करणाऱ्या पक्षाच्या मुळावर घाव घालू नका, पक्षाला मजबूत करा, असे चौधरी यांनी म्हटलं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षध्याक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहल्यानंतर काँग्रेस बंडखोर आणि गांधी निष्ठावान यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. आनंद शर्मा हे बंडखोर जी-23 नेत्यांमधील एक आहेत.

आनंद शर्मा यांचे अधीर रंजन चौधरी यांच्या आरोपांना उत्तर -

सर्वसमावेशक, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेसच्या विचारसरणीवर मी ठामपणे वचनबद्ध आहेच, परंतु मी पक्षाचा इतिहासकार आणि विचारवंतांपैकी एक आहे. त्या संदर्भातच माझे वक्तव्य विचारात घेतले पाहिजे. मतभेद किंवा वैचारिक मुद्दे असतानाही मी राजकीय संवादावर विश्वास ठेवत. हे प्रकरण मी वैयक्तिक असू शकत नाही. हे माझ्या मूल्यांच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटलं.

आनंद शर्मा यांचे अधीर रंजन चौधरी यांच्या आरोपांना उत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.