ETV Bharat / bharat

Sienna Chopra Mount Kilimanjaro : कर्नालच्या 6 वर्षीय सिएनाने 17,000 फुटांवर फडकवला तिरंगा!

author img

By

Published : Jan 28, 2023, 9:57 AM IST

Sienna Chopra
सिएना चोप्रा

कर्नालच्या 6 वर्षीय सिएना चोप्राने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारोवर तिरंगा फडकवला. आता सिएना शुक्रवारी आफ्रिकेतील पाचवे सर्वोच्च शिखर माउंट मेरू जिंकण्यासाठी पुढील मोहिमेसाठी रवाना झाली आहे.

सिएना चोप्रा

कर्नाल (हरियाणा) : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो जिंकण्यासाठी कर्नालची सिएना चोप्रा 21 जानेवारी रोजी मुंबईहून निघाली होती. सिएना चोप्राचे वय अवघे 6 वर्षे आहे. तिने 22 जानेवारीला आपल्या वडिलांसोबत मुसी टाऊन येथून गिर्यारोहण सुरू केले. या दरम्यान, तिचे लक्ष्य आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर जिंकण्याचे होते. या शिखराची उंची 19,341 फूट आहे. मात्र जोरदार वादळामुळे त्यांना फक्त १७ हजार फुटांवर भारतीय तिरंगा फडकवावा लागला.

13000 फुटांवर असताना जोरदार वारे आले : गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सिएना चोप्राचे लक्ष्य २६ जानेवारीला १९,३४१ फूट उंचीवर तिरंगा फडकवण्याचे होते. जेव्हा किलीमांजारो पर्वत जिंकण्यासाठी सिएना १३,००० फुटांवर पोहोचली, त्याच वेळी जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे चढाई कठीण झाली. असे असतानाही सिएना चोप्रा धैर्याने चढत राहिली आणि तिरंगा घेऊन पुढे जात राहिली.

सिएना पुढील मोहिमेसाठी रवाना : २६ जानेवारीला सिएना चोप्रा १७ हजार फुटांवर पोहोचली. तेव्हाच जोरदार वादळ येऊ लागले. त्यानंतर तिने तेथे तिरंगा फडकवून आपले किलीमांजारो मिशन पूर्ण केले. मिशन किलीमांजारोसाठी, हरियाणाचे महिला आणि बाल विकास मंत्री कमलेश धांडा आणि खासदार नायब सैनी यांनी सिएना चोप्रा यांना भारताचा ध्वज प्रदान केला. आता सिएना चोप्रा शुक्रवारी आफ्रिकेतील पाचवे सर्वोच्च शिखर माउंट मेरू जिंकण्यासाठी तिच्या पुढील मोहिमेसाठी रवाना झाली आहे.

तरुणाने सर केले ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर : हरियाणाच्याच रेवाडी जिल्ह्यातील नेहरूगढ गावातल्या एका तरुण गिर्यारोहकाने प्रजासत्ताक दिनी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोशियस्को सर केले आहे. 23 जानेवारीला त्याने या मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेला 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' असे नाव देण्यात आले होते. नरेंद्रने प्रजासत्ताक दिनी दुसऱ्यांदा हे शिखर सर केले आणि माऊंट कोशियस्कोवर तिरंगा फडकवला. माउंट कोसियुस्को हा ऑस्ट्रेलियन खंडातील सर्वात उंच पर्वत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्तालयाचे उपायुक्त सुनीत मेहता यांनी फोन करून नरेंद्र याचे अभिनंदन केले. नरेंद्रने 5 खंडातील सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी शालेय शिक्षणादरम्यान नरेंद्रने जम्मू-काश्मीरच्या टेकड्या चढून आपल्या गिर्यारोहणाची सुरुवात केली होती. 2008 पासून नरेंद्रने नियमितपणे गिर्यारोहणाचा सराव सुरू केला.

हेही वाचा : Air India Tale Art : कोचीतील कला महोत्सवात एयर इंडियाच्या नव्या टेल आर्टचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.