ETV Bharat / bharat

Air India Tale Art : कोचीतील कला महोत्सवात एयर इंडियाच्या नव्या टेल आर्टचे अनावरण

author img

By

Published : Jan 28, 2023, 9:20 AM IST

कोचीतील कोची-मुजिरिस बिएनले कला महोत्सवात एयर इंडियाच्या नव्या टेल आर्टचे अनावरण करण्यात आले आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा समकालीन कला महोत्सव असून तो उत्सव एप्रिल २०२३ पर्यंत चालेल. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या उत्सवाचे ऑफिशियल ट्रॅक्लपार्टनर्स आहेत.

air india Tale Art
एयर इंडिया टेल आर्ट

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्सप्रेसने कोची मुजिरिस बिएनलेमध्ये विकसित आणि एका बोईंग ७३७ - ८०० एअरक्राफ्टवर इन्स्टॉल करण्यात आलेल्या नव्या टेल आर्टचे अनावरण केले आहे. हा सोहळा केरळचे सार्वजनिक कामे आणि पर्यटन विभागाचे माननीय मंत्री पी. ए. मोहम्मद रियास, एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ आणि एअर एशिया इंडियाचे प्रेसिडेंट आलोक सिंह व कोची बिएनले फाऊंडेशनचे प्रेसिडेंट बोस कृष्णमाचारी यांच्या हस्ते पार पडला.

२५ फूट लांब टेल आर्टमध्ये रूपांतरित : कलाकार जीएस स्मिता यांच्या मूळ ऍक्रेलिक पेंटिंगला २५ फूट लांब टेल आर्टमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या चित्रामध्ये स्मृती विमानांमार्फत एक समांतर कालरेखा दर्शवली गेली आहे. यामध्ये सरडा, हिरवे नाकतोडे, सूक्ष्मजीव आणि जलीय जीवांनी भरलेले रंगीत लँडस्केप साकारण्यात आले आहे. या मेटाफिजिकल पेंटिंगमध्ये छोट्या जीवांचे लहानसे विश्व आणि डोंगर, फुलापानांचे विशाल जग एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे. हा समारंभ थिरुवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया इंजिनीयरिंग सर्व्हिसेस येथे पार पडला.

आर्टवर्क्स एअरक्राफ्ट्सच्या टेल्सवर प्रदर्शित करण्याची परंपरा : देशातील कला आणि संस्कृती यांच्याप्रती वचनबद्ध एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये समृद्ध भारतीय संस्कृती व वारसा दर्शवणारे, अद्वितीय आर्टवर्क्स एअरक्राफ्ट्सच्या टेल्सवर प्रदर्शित करण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची कोची-मुजर बिएनले यांची भागीदारी कला आणि एव्हिएशन यांचा सुंदर मिलाप आहे आणि कोची बिएनलेच्या कलाकारांनी साकारलेले टेल आर्ट या भागीदारीचे एक अमूल्य प्रतीक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा समकालीन कोची-मुजिरिस बिएनले कला महोत्सव डिसेंबर २०२२ मध्ये सुरु झाला आहे. हा उत्सव एप्रिल २०२३ पर्यंत चालेल. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या उत्सवाचे ऑफिशियल ट्रॅक्लपार्टनर्स आहेत.

अनोखा कला उत्सव : एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ आणि एअर एशिया इंडियाचे प्रेसिडेंट आलोक सिंह यांनी एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या टेल आर्टबद्दल सांगितले, 'कोची-मुजिरिस बिएनले देशात या प्रकारचा अतिशय अनोखा कला उत्सव आहे आमच्या एअरक्राफ्टवर बिएनलेने विकसित केलेल्या कलेमार्फत बिएनलेला उंच आकाशांमध्ये घेऊन जाताना आम्हाला अतिशय गर्व वाटत आहे. आम्हाला खात्री आहे की या कला उत्सवाची पर्यटन क्षमता अजून मजबूत करण्यात हा सहयोग खूप मोलाची भूमिका बजावेल.'

संस्कृतीप्रती त्यांची वचनबद्धता : केरळचे सार्वजनिक कामे आणि पर्यटन विभागाचे माननीय मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांनी सांगितले, '१९३५ साली टाटा यांचे पहिले विमान याच थिरुवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. आजवर केरळने असे अनेक महत्त्वाचे टप्पे अनुभवले आहेत. आमच्या राज्याच्या वाटचालीत पर्यटनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. केरळ हे सर्वोत्तम पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्रभावी भारतीय संस्कृती साकारण्यात आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस व कोची बिएनले यांच्या दरम्यानची ही अनोखी भागीदारी कला व संस्कृतीप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवते. केरळमधील चारही विमानतळांवर एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उपलब्ध आहेत आणि मी आशा व्यक्त करतो की भारतीय विमानचालन उद्योगक्षेत्रात या कंपनीचे स्थान उत्तरोत्तर अधिकाधिक मजबूत होत जाईल.'

हेही वाचा : Engineer Samosa : तरुणाने इंजिनियरींग सोडून सुरू केले समोसा दुकान, मिळतात इंजिनिअरींगच्या विविध ट्रेडचे समोसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.