ETV Bharat / bharat

Awantipora Accident : जम्मू काश्मीरमध्ये अपघातात चार प्रवासी मजूर ठार, अनेक जखमी

author img

By

Published : Mar 18, 2023, 2:54 PM IST

जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा येथे झालेल्या अपघातात ४ प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Accident
अपघात

पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) : श्रीनगर - जम्मू महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण वाहतूक अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात श्रीनगर - जम्मू महामार्गावर गोरीपोरा येथे एक बस उलटली. या अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व मृतक बिहारचे रहिवासी : स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्यापैकी तिघांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तर अन्य एका व्यक्तीचा एसडीएच पानपूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या चार झाली आहे. नसरुद्दीन अन्सारी, राहणे पश्चिम चंपारण, बिहार, राज किरण दास, राहणे गोविंदपूर, बिहार आणि सलीमुद्दीन मुहम्मद अली, राहणे किशनगंज, बिहार अशी या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

जखमींवर उपचार सुरु : अपघातात जखमी झालेल्या इतरांनाही उपजिल्हा रुग्णालयात पानपूर येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अवंतीपोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या महामार्गावर अनेक अपघात होतात : दरवर्षी श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अपघातात शेकडो लोक मृत्युमुखी पडतात तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येते. श्रीनगर - जम्मू महामार्गावर जम्मू प्रांतातील रामबन जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूक अपघात होतात. अपघात कमी व्हावेत यासाठी शासनाने महामार्ग खुला करण्यास मान्यता दिली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असतानाही अद्याप तो खुला करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

हे ही वाचा : Col VVB Reddy : हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्नल रेड्डी यांना हैदराबाद विमानतळावर श्रद्धांजली, आज मूळ गावी अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.