ETV Bharat / bharat

Ujjain on Mahashivratri : महाशिवरात्रीला उज्जैन शहर 21 लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार, वाचा सविस्तर

author img

By

Published : Feb 12, 2023, 3:13 PM IST

Updated : Feb 17, 2023, 8:53 AM IST

महाशिवरात्री उत्सवानिमित्त 'शिव ज्योती अर्पणम-2023' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात 18 फेब्रुवारी रोजी सुमारे 21 लाख मातीचे दिवे प्रज्वलित केले जातील, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

Ujjain on Mahashivratri
उज्जैन शहर 21 लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

भोपाळ : गेल्या वर्षी महाशिवरात्रीला उज्जैनमध्ये 11,71,078 मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. आता 21 लाख दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मेगा इव्हेंटच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 18 फेब्रुवारीला दिवाळीप्रमाणेच उज्जैनमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाईल. महाशिवरात्रीला उज्जैनचे रहिवासी दीपप्रज्वलन करून भगवान महाकालाला आपले समर्पण व्यक्त करतील. ही अभूतपूर्व घटना समाज आणि सरकारच्या सहभागानेच शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले.

महाशिवरात्रीचे महत्व : महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ पृथ्वीवर उपस्थित असलेल्या सर्व शिवलिंगांमध्ये वास करतात आणि पूजा-अर्चा केल्याने प्रसन्न होतात. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा विशेष उल्लेख आहे. या विश्वाची निर्मिती, संचालन आणि विनाश यासाठी या तिघांना जबाबदार मानले जाते. भगवान ब्रह्मदेवाला निर्माता म्हणून, भगवान विष्णूला रक्षक म्हणून आणि भोलेनाथ शंकराला विनाशाचे प्रतीक म्हणून पूजले जाते. महाशिवरात्रीचा सण भोलेनाथांशी संबंधित असून; या दिवशी भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीशी झाला होता, म्हणूनच याला 'महाशिवरात्री' म्हणतात. या वेळी महाशिवरात्रीचा उत्सव शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

महाशिवरात्रीला आहे विशेष योग : 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारीच शनि प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीही साजरी केली जात आहे. प्रदोष व्रताच्या दिवशीही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते. 2023 मध्ये महाशिवरात्रीला शनि प्रदोषाचा योगायोग होणार आहे. धार्मिक पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता असेल. त्यामुळे 18 फेब्रुवारीला शनि प्रदोष व्रतही पाळले जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 08:02 वाजता सुरू होईल आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 04:18 वाजता समाप्त होईल. निशिता काळात महाशिवरात्रीची पूजा केली जाते.

कुठे असणार विद्युत सजावट : उज्जैनमध्ये शिव ज्योती अर्पण कार्यक्रमांतर्गत शहरातील मंदिरे, व्यावसायिक ठिकाणे, घरे आदी ठिकाणी मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. क्षिप्रा नदीचा किनारा आणि महत्त्वाची चौक आणि ठिकाणे. याशिवाय उज्जैनमधील प्रमुख ठिकाणे विद्युत सजावट आणि रांगोळीने उजळली जातील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

शून्य कचरा थीम राबविण्यात येणार : गेल्या वर्षी महाशिवरात्रीला उज्जैनमध्ये 11,71,078 दिव्यांची रोषणाई केल्यानंतर 2022 च्या दिवाळीला उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात 15.76 लाख दिवे प्रज्वलित करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला, असे ते म्हणाले. यावेळी महाशिवरात्रीला उज्जैनमधील संपूर्ण कार्यक्रम 'शून्य कचरा' तत्त्वावर आधारित असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमात 20,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Mahashivratri 2023 : यंदाची महाशिवरात्री आहे अत्यंत खास, सर्वार्थ सिद्धी योगासह येतोय शनि प्रदोषचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Feb 17, 2023, 8:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.