ETV Bharat / bharat

Corona Update : भारतात 2.68 लाख नवीन कोरोना रुग्ण, पाॅझिटिव्हीटी दर 16.66% वर

author img

By

Published : Jan 15, 2022, 10:59 AM IST

Updated : Jan 15, 2022, 11:06 AM IST

भारतात 2.68 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद (Record of new corona patients) झाली आहे तर पाॅझिटिव्हीटी दर (Positivity rate) 14.7% वरून 16.66% वर गेला आहे काल म्हणजे शुक्रवारी तो काल 14.7% होता. यात ओमायक्राॅन या नव्या वेरियंटची (Omicron new variant) लागण झालेल्या 6 हजार 041 रुग्णांचा समावेश आहे. तर 24 तासात 402 नवे मृत नोंदवल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीत समोर आले आहे.

Corona Update
Corona Update

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 लाख 17 हजार 820 वर पोहोचली आहे. जी गेल्या 221 दिवसांत सर्वाधिक आहे. त्याच बरोबर दैनंदिन सकारात्मकता दर 16.66% टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आकडेवारीत ओमायक्रॉनच्या 6 हजार 041 रुग्णांचाही समावेश आहे, शुक्रवारपासून 5.01% च्या वाढीसह साप्ताहिक सकारात्मकता दर आता 12.84% टक्के नोंदवला गेला आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 14 लाख 17 हजार 820
कोरोना रुग्णांत 24 तासांत 2 लाख 68 हजार 833 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, ती काल म्हणजे शुक्रवारपेक्षा 4 हजार 631 ने अधिक आणि गेल्या 240 दिवसांतील सर्वाधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. आकडेवारीनुसार देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 लाख 17 हजार 820 झाली आहे.

402 नवीन मृत्यूची नोंद
देशात गेल्या 24 तासांत कोरोना मुळे 402 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण मृतांची संख्या 4 लाख 85 हजार 752 वर पोहोचली आहे, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दिलेल्या एकत्रित डोसची संख्या 156.02 कोटींहून अधिक झाली आहे. आतापर्यंत 70.07 कोटींहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यापैकी 16 लाख 13 हजार 740 चाचण्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा : Maharashtra Corona Update : आज राज्यात 43 हजार 211 रुग्णांची नोंद, तर 19 रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Jan 15, 2022, 11:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.