महाराष्ट्र

maharashtra

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'महापंगत', लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद अस्वाद

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 8:01 PM IST

बुलडाणा Swami Vivekananda birth anniversary : बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. तीन दिवस उत्सव साजरा करून आज महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. या महाप्रसादाचा अडीच लाख भाविकांनी लाभ घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन, हरिपाठ, व्याख्यान, शेतकरी मार्गदर्शन, साहित्य संमेलन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर शेवटच्या दिवशी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन आश्रमाकडून करण्यात आलं होतं. या महाप्रसादाची तयारी 2 दिवसांपासून अखंडपणे सुरू होती. त्यामुळं जयंतीनिमित्तानं लाखो भाविकांनी महाप्रसाद अस्वाद घेतला आहे. संपूर्ण भारतातील हा एकमेव आश्रम आहे, जिथं स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या महाप्रसादाचं महत्त्व असं आहे की, दोन्ही हातांनी शंख वाजवल्याशिवाय कोणीही महाप्रसादाचं सेवन करत नाही. हिवरा येथे 1965 पासून हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाची सुरवात शुकदास महाराजांनी सुरू केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details