महाराष्ट्र

maharashtra

रामफळावरचं रेखाटले श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, राम मंदिर; येवल्यातील संतोष राऊळ यांची अप्रतिम कला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 9:42 PM IST

येवला (नाशिक) Shriram On Ramphal: अयोध्या येथे श्रीराम मंदिर पूर्ण झाले असून याच राम मंदिरात उद्या (22 जानेवारीला) श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. (Ram temple ceremony) या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम उत्साहात साजरे होत असतानाच येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी अक्षरशः रामफळावरच अयोध्या येथील श्रीरामांच्या मंदिरासह श्रीराम, सीता (Sita), लक्ष्मण (Laxman), हनुमान (Hanuman) यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. श्रीराम, सीता, लक्ष्मण हे अयोध्यातील राम मंदिरात जात असतानाचे चित्र देखील या रामफळावर चित्रित केले आहे. (Ram Mandir Pranpratistha)

राम, लक्ष्मण, सीता, हनुमान देखील साकारले: रामफळ सर्वांनाच परिचित असून हे फळ तुरळक दिसत असल्यानं अक्षरश: येवल्यातील कलाकाराने हे रामफळ उपलब्ध करून घेत आपली कला या रामफळावरच साकारली. (Ram temple Ayodhya) त्याने या रामफळावर श्रीराम प्रभूंची प्रतिमा तसेच लक्ष्मण सीता देखील अ‍ॅक्रिलिक कलरच्या साह्याने चित्रित केली आहे. तसेच हनुमानजी देखील या रामफळावर साकारले आहे. (Ram Mandir Inauguration) त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा अयोध्या येथील राम मंदिर देखील अप्रतिमरीत्या आपल्या हाताच्या साह्याने चित्रित करून काढले आहे. अनेक राम भक्त देखील भगवे झेंडे घेऊन या राम मंदिराच्या दिशेने जात असल्याचे देखील या रामफळावर काढण्यात आले आहे.

चित्र रेखाटणासाठी 14 तासांचा कालावधी: प्रभू रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास लाभला होता. त्या दृष्टिकोनातून आपण देखील 14 तासातच हे चित्र रामफळावर रेखाटू, असा निश्चय कलाकार संतोष राऊळ यांनी केला. त्यांनी रामफळावर श्रीराम प्रभूंची अयोध्या नगरी साकारण्यात सुरुवात केली व तब्बल 14 तासात या अनेक रामफळांवर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान तसेच अयोध्यातील राम मंदिर साकारले.

ABOUT THE AUTHOR

...view details