महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील निवडणुकीच्या आखाड्यावर पावसाचे काळे ढग; जाणून घ्या, तुमच्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज - Weather Update

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 1:57 PM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात एकीकडं लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असतानाच आता दुसरीकडं पुढील 24 तासांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.

imd rain prediction in next 24 hours in maharashtra
पुढील 24 तासात पावसाची शक्यता (ETV Bharat)

मुंबई Maharashtra Weather Updates :गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावल्याच दिसून येत असतानाच आता राज्यात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा शाखेकडून वर्तवण्यात आली आहे. ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच आज मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

कोकणात काही ठिकाणी हलक्या सरींसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मुंबईत विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तास आकाश बहुतांशी निरभ्र राहील आणि संध्याकाळी अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या सरी बरासण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 24 तासांत कोकणातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता असून हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. तसंच पुणे, सातारा, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

हेही वाचा -

  1. राज्यातील १९ जिल्ह्यात आज यलो अलर्ट, नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज - Maharashtra weather update
  2. चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजेरी, उकड्यापासून नागरिकांना दिलासा - Heavy rain in Chandrapur
  3. अवकाळी पावसाचा अमित शाहांच्या सभेला फटका; पावसामुळं अमित शाह यांनी घेतलं भाषण आटोपतं, पाहा व्हिडिओ - Amit Shaha News

ABOUT THE AUTHOR

...view details