महाराष्ट्र

maharashtra

महापालिकेचे बाल शास्त्रज्ञ निघाले इस्रोला; खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याची मिळाली सुवर्णसंधी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 11:24 AM IST

Students ISRO Tour : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड रुजावी, भविष्यातही विज्ञान विषयाचा अभ्यास करण्याची रुची त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झालीय. खगोल अभ्यास वर्ग उपक्रमा अंतर्गत 34 विद्यार्थ्यांची इस्रोच्या अभ्यासपूर्ण दौऱ्यासाठी निवड झालीय. या दौऱ्या दरम्यान विद्यार्थी इस्रोच्या अंतराळवीरांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहेत.

Isro story
भारतीय अंतराळ संशोधन संस्था

प्रतिक्रिया देताना खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण

ठाणे Students ISRO Tour : लहानपणापासून आकाशात चंद्र तारे बघत मोठे होत असताना सर्वांनाच त्याची भुरळ पडते. आकाशात दिसणारा चांदोमामा आणि टिमटिमणारे तारे बघण्याची उत्सुकता वाढत्या वयाबरोबर हळूहळू कमी होत जाते. परंतु काही मुलांच्या मनात हे आकर्षण कायम राहतं आणि ते चंद्र ताऱ्यांचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतात. परंतु पुरेशा सुविधा अभावी अनेकांना आपलं स्वप्न भंग होताना आपल्याच डोळ्यांनी पहावं लागतं. परंतु आता एक सुवर्णसंधी लहान मुलांसाठी उपलब्ध झालीय. ठाणे महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी आणि नववीचे काही विद्यार्थी १९ फेब्रुवारी रोजी एका अभ्यासपूर्ण दौऱ्यासाठी इस्रोला रवाना झाले आहेत. आज विद्यार्थी इस्रोला पोहचणार आहेत.

34 विद्यार्थ्यांना मिळाली इस्रोला भेट देण्याची संधी :भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं कामकाज कसं चालतं ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी या मुलांना उपलब्ध झालीय. खगोल अभ्यास वर्ग उपक्रमा अंतर्गत विज्ञान मंचातील सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयाची स्पर्धा घेण्यात आली होती. या दोन विषयांमधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण 77 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना नारायणगाव तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी येथे नेण्यात आलं होतं. तेथे पुन्हा छानणी करून 36 जणांची निवड केल्यानंतर त्यापैकी एकूण 34 विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देण्याची संधी उपलब्ध झालीय. निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांमध्ये एकूण 19 मुले आणि 15 मुली आहेत. या 34 विद्यार्थ्यांबरोबरच आठ शिक्षकांनादेखील इस्रोला भेट देण्याची संधी मिळालीय.



विद्यार्थी साधणार संवाद : दौऱ्यादरम्यान हे विद्यार्थी इस्रोच्या अंतराळवीरांशी संवाद साधतील आणि त्यांचे अनुभव जाणून घेतील. अंतराळात रॉकेटचं प्रक्षेपण कसं होतं याची माहिती देखील मुलांना देण्यात येईल. ही संधी आयुष्यात एकदाच मिळते. त्यामुळं मुलांनी याचा पुरेपूर फायदा घेत तेथील शास्त्रज्ञांच्या भेटी आणि मुलाखती घेऊन अंतराळ आणि त्या संबंधित सर्व माहिती नोंद करून घ्यावी. इस्रो मध्ये असलेल्या वस्तू संग्रहालयाला देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असा सल्ला देखील ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. ISRO Aditya L1 : इस्रोच्या आदित्य L1 नं जवळून अनुभवल्या सूर्याच्या झळा, शेअर केला पहिला मिशन डाटा
  2. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोला 'या' तारखेला भेट देणार
  3. चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details