ETV Bharat / bharat

ISRO Aditya L1 : इस्रोच्या आदित्य L1 नं जवळून अनुभवल्या सूर्याच्या झळा, शेअर केला पहिला मिशन डाटा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 7:57 PM IST

Updated : Nov 7, 2023, 8:24 PM IST

ISRO Aditya L1
ISRO Aditya L1

ISRO Aditya L1 : 'आदित्य L1' च्या पेलोड HEL1OS ने सौर फ्लेअर्सची पहिली उच्च-ऊर्जा एक्स-रे झलक मिळवली आहे. याबाबतची माहिती 'इस्रो'नं आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली. त्यामुळं हा भारतासाठी महत्वाचा डेटा असल्याचं सांगितलं जातंय.

बेंगळुरू ISRO Aditya L1 : भारताच्या सौर मिशन आदित्य L1 ने त्याच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मंगळवारी (७ नोव्हेंबर) सांगितलं की, आदित्य L1 च्या पेलोड HEL1OS ने सौर फ्लेअर्सची पहिली उच्च-ऊर्जा एक्स-रे झलक मिळवली आहे.

  • Aditya-L1 Mission:
    HEL1OS captures first High-Energy X-ray glimpse of Solar Flares

    🔸During its first observation period from approximately 12:00 to 22:00 UT on October 29, 2023, the High Energy L1 Orbiting X-ray Spectrometer (HEL1OS) on board Aditya-L1 has recorded the… pic.twitter.com/X6R9zhdwM5

    — ISRO (@isro) November 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या दरम्यान निरीक्षण केलं : बेंगळुरूमधील इस्रोच्या यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC) च्या अंतराळ खगोलशास्त्र गटानं विकसित केलेल्या HEL1OS ने २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या पहिल्या निरीक्षण कालावधीत हे निरीक्षण केलं. इस्रोनं सांगितलं की, रेकॉर्ड केलेला डेटा यूएसच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) जिओस्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायर्नमेंटल सॅटेलाइट्स (GOES) द्वारे प्रदान केलेल्या एक्स रे लाईट किरणांशी सुसंगत आहे.

२ सप्टेंबरला प्रक्षेपण झालं : आदित्य एल १ ही भारताची पहिली सौर मोहिम आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) नं ही मोहिम २ सप्टेंबर रोजी लाँच केली होती. इस्रोनं PSLV C57 या प्रक्षेपण वाहनातून आदित्य L1 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण पार पाडण्यात आलं.

'लॅग्रेंज पॉइंट १' येथून सूर्याचा अभ्यास करेल : आदित्यला १५ लाख किमी अंतरावरील एल १ पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १०९ ते १२० दिवस लागतील. तसं पाहिलं तर येथे ४०,००० किमी वेगानं अवघ्या २० दिवसात पोहोचता येतं, मात्र त्यासाठी जास्तीचं इंधन खर्च होईल. आदित्य एल १ पृथ्वी आणि सूर्यामधील 'लॅग्रेंज पॉइंट १' येथून सूर्याचा अभ्यास करेल. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किमी दूर आहे.

हेही वाचा :

  1. Aditya L१ Launch : अखेर अवकाशात झेपावलं 'आदित्य एल १'; 'या' ठिकाणावरुन करणार सूर्याचा अभ्यास
  2. Aditya L1 Sends Image : आदित्य एल1ने घेतला सेल्फी; पृथ्वी आणि चंद्राचेही क्लिक केले फोटो...
  3. Aditya L1 mission : आदित्य L1ची चौथी कक्षा यशस्वीरित्या पूर्ण; इस्रोनं दिली माहिती
Last Updated :Nov 7, 2023, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.